पुणे

कदम-वाकवस्ती येथे अंदाजे ९० कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ थाटात साजरा..!

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

कदम-वाकवस्ती, पालखीस्थळ याठिकाणी कदम-वाकवस्ती गावाला संजीवनी ठरणाऱ्या ८९ कोटी ९७ लाख १५ हजार दोनशे रुपयांची योजना या योजनेचा कार्यारंभ कार्यक्रम सकाळी १० वाजता पार पडला,या कामाचा कार्यारंभ उद्घाटन कार्यक्रम मा.गणपत काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी मा.श्री.चित्तरंजन गायकवाड यांनी पाणीपुरवठा योजनेचा संपूर्ण प्रवास सांगितला तसेच तसेच २०१८ साली या योजनेचे काम सुरू झाले होते त्यावेळी स्वर्गीय आमदार बाबुरावजी पाचर्णे साहेब यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले ही योजना मंजूर करताना आलेल्या अडचणी आणि केलेला पाठपुरावा या जोरावर योजना मंजूर होऊन काम सुरू होत आहे असे सांगितले व योजनेची संपूर्ण माहिती नागरिकांना दिली,तसेच येणाऱ्या भविष्य काळात खऱ्या अर्थाने कदम-वाकवस्ती गावाच्या विकासाला मोठी चालना मिळेल , व कार्यक्रमाचे उद्घाटन मा.गणपत काळभोर यांनी देखील सरपंच गौरीताई गायकवाड यांचे कौतुक केले, योग्य ते मार्गदर्शन तसेच काम पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या,कार्यक्रम प्रसंगी बोलताना सरपंचांनी योजनेची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली, पाणी योजना आपल्या गावात झाल्यानंतर गावाचा होणारा सर्वांगीण विकास, गावचा बदलणारा चेहरा याविषयी माहिती दिली व नागरिकांना पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अरुण काळभोर व मा. अशोक कदम हे लाभले, कार्यक्रम अतिशय सुंदर वातावरणात पार पडला,व आज खऱ्या अर्थाने या योजनेच्या कामाला सुरुवात झाली, यावेळी माझ्यासमवेत नवपरिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड,ग्रामपंचायत सदस्या- माधुरीताई काळभोर, सविताताई साळुंखे, राजश्रीताई काळभोर, वैजंताताई कदम, राणीताई बडदे , ग्रामपंचायत सदस्य-नासिर पठाण, सचिन दाभाडे, रमेश कोतवाल, ग्रामसेवक-घोळवे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम, माजी पोलिस पाटील-प्रियांकाताई भिसे, ग्रामपंचायत सदस्या-रुक्मिणीताई चांदणे, वसुधाताई केमकर, तसेच गुरुदेव जाधव सर, सुभाष कदम, बाबासाहेब गुजर, अशोक शिंदे, मधुकर कदम, मुकुंद काळभोर, कुमार कदम,बाप्पूसाहेब चांदणे, राजेंद्र काळभोर, अमर काळभोर, दिलीप काळभोर, धर्माआप्पा गायकवाड, प्रताप कदम, उदय काळभोर,माऊली काळभोर, सुरेश काळभोर, जयसिंग घाडगे, अभिजित बडदे, गौरव काळभोर, बाबा गायकवाड, राहुल काळभोर, ज्ञानेश्वर नामुगडे, कुणाल कांबळे, शब्बीर पठाण, विजय बोडके, रामदास पवार, अविनाश बडदे, दीपक काळभोर, जाफर सय्यद, शरद जाधव, श्रीनिवास पाटील, किरण काळभोर, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश कायगुडे याने केले.