पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
पुणे महानगर पालिका हद्दीतील थकीत मालमत्ताधारकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय आहे तो निर्णय महापालिकेने तत्काळ मागे घेण्यात यावा अन्यथा, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र वाघ यांना आम आदमी पार्टी कडून काल निवेदन देण्यात आले, यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, डॉ. अमर डोंगरे, के. टी बारापत्रे, प्रकाश हागवणे, सीता केंद्रे, युवा नेते कमलेश रानावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने ज्या निवासी मालमत्ता मध्ये नागरिक वास्तव्य करतात अशा थकबाकीदारांकडे थकबाकी आहे अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजेच कार, टीव्ही, फ्रिज, आधी वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई
महापालिकेमार्फत याच आठवड्यात जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे, हा निर्णय चुकीचा आहे, समुपचाराने कर वसुली झाली पाहिजे, त्यामुळे या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी, त्याची अंमलबजावणी करू नये अन्यथा आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.