पुणे

पुणे शहर पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती; अमिताभ गुप्ता यांची मुंबईत बदली, पिंपरी चिंचवड आयुक्तपदी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

महाराष्ट्र ग्रहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेंच महासंचालक, सह आयुक्तांच्या बदल्या केल्या असून सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तसेंच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्तपदाचा सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याचे रितेशकुमार यांनी सांगितले आहे, तसेंच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी लाच प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे, पुण्यातील लाच लुचपत अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मुंबई म्हाडा येथील मुख्य दक्षता अधिकारी व अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलीस महासंचालक सुनिल फुलारी यांची नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक प्रवीण पवार यांची कोकण परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

मोक्का किंग पुणे शहर माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता कोरोनामुळे कारागृहातून असंख्य गुन्हेगारांना जामीनावर सुटल्यानंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली होती, पुणे शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सर्वप्रथम या सर्व गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी गेल्या अडीच वर्षांत तब्बल ११४ गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली तर या वर्षात ५१ टोळ्यांवर कारवाई केली.

त्याचबरोबर बड्या ६८ गुन्हेगारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई केली, एका पथकाने अगोदर संपूर्ण माहिती काढायची, दुसर्या पथकाने धडक कारवाई करायची अन तिसर्या पथकाने सर्व पाळेमुळे खणून काढायची अशा पद्धतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहर परिसरात अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत वचक बसवून दरारा निर्माण केला, इतकेच नाही तर अगदी दादरा नगर हवेली, कर्नाटकातही पथके पाठवून गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते.