मुंबई दि.14 – इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 450 फूट उंच पुतळ्याची निर्मिती उत्तर प्रदेशात गजियाबद येथील शिल्पकार राम सुतार यांच्या कारखान्यात होत आहे. तेथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट उंच स्टॅच्यु ऑफ ईक्वालिटी उभारण्यासाठी या पुतळ्याचे 25 फुटांचे मॉडेल साकार करण्यात आले असून या पुतळ्याच्या मॉडेल ची पाहणी ना.रामदास आठवले यांनी केली व त्यात काही सूचना केल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे मॉडेल चांगले असून चेहरा ही मिळताजुळता आहे. त्यामुळे लवकर हे मॉडेल समाजातील मान्यवरांना दाखवून त्यांच्या सूचना स्वीकारून पुतळा लवकर तयार करण्याची सुचना ना.रामदास आठवले यांनी शिल्पकार राम सुतार आणि अनिल सुतार यांना केली. इंदूमिल मध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 450 फूट पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी किमान 2 वर्षे लागणार आहेत. त्यासाठी शासनाने पुतळा उभारण्यासाठी तयार असलेल्या 25 फुटी मॉडेल ला मान्यता त्वरित दिली पाहिजे.तसेच आम्हाला शासनाने पुतळा उभारण्याचा निधी काही प्रमाणात त्वरित दिला पाहिजे अशी मागणी शिल्पकार राम सुतार यांनी ना.रामदास आठवले यांच्याकडे केली. याबाबत आपण लवकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी; महापरिनिर्वाण समन्वय समिती चे सरचिटणीस नागसेन कांबळे; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सुनील बन्सी मोरे; घनश्याम चिरणकर; भाग्यराज आदी मान्यवर उपस्थित होते.
इंदूमिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 450 फुटी पुतळ्याचे 25 फुटी मॉडेल तयार – शिल्पकार राम सुतार यांच्या गाजियाबद मधील कारखान्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन प्रस्तावित पुतळ्याच्या मॉडेल ची केली पाहणी
December 15, 20220
Related Articles
October 5, 20240
वाहनचोरीतील दोन सराईतांना ठोकल्या बेड्या येरवडा पोलिसांची कामगिरी ः दोन लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे ः मोपेड विक्रीसाठी आलेल्या वाहनचोरीतील दोन सराईतांना संशयावरून येरव
Read More
July 24, 20219
पुणे जिल्ह्यात सुरु असणाऱ्या ‘अटल भूजल योजने’तील कामांच्या गुणवत्तेसह दर्जावर विशेष लक्ष द्या -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना
पुणे, दि. 24 : पुणे जिल्ह्यात ११८ गावात सुरु असणाऱ्या अटल भूजल योजनेतील कामांन
Read More
July 19, 20230
हडपसरचे नाव परदेशात गाजविणारा…आयर्नमॅन डॉक्टर – शंतनू जगदाळे
"पंख दिले देवाने, करविहार सामर्थ्याने" या गाण्यातील ओळीने मला जीद्द दिली त्य
Read More