पुणे

हडपसर- महम्मदवाडी येथील कुटुंबाला नाताळ साजरा करणे पडले महागात, चोरट्यांनी तब्बल २५ लाख रुपयांचा मारला हात …!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

नाताळ सण साजरा सण हा संपूर्ण जगात फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो,तेवढ्याच प्रमाणात भारतातही नाताळ हा सण तेवढ्याच उत्सहात साजरा केला जातो , हडपसर परिसरातील महम्मद वाडी परिसरामध्ये हा सण साजरा करण्यासाठी एक कुटुंब चर्चमध्ये रात्री प्रार्थनेसाठी गेले असताना त्या कुटुंबाच्या सदनिकेमध्ये चोरट्यांनी २४ लाख ७७ हजार रुपयांच्या ऐवजावर हात मारला.

ही घटना महम्मदवाडीतील न्याती व्हिक्टोरिया सोसायटी मध्ये घडली आहे, याप्रकरणी सदनिकेची मालकीण असणाऱ्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आणि तिचे संपूर्ण कुटुंबीय नाताळ सण साजरा करण्यासाठी शनिवारी (२४ डिसेंबर) रात्री बाहेर होते त्याच रात्री चोरट्यांनी सदनिकेच्या खिडकीची लोखंडी जाळी उचकटून घरात प्रवेश करून १२ हजारांची रोकड, हिरेजडीत दागिने तसेंच सोन्याचे दागिने असा २४ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असून त्याप्रकरणी पुढील तपास सुरु असून लवकरात लवकर पकडण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.