पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
मागील काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दिसत आहे, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे, त्यातच नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड परिसरातील काळेवाडी येथे घडली आहे.
शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी दुपारी काळेवाडी परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवरील मदनुर येथे आढळून आला आहे, त्यामुळे परिसरात सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे, शिवशंकर शिंदे असे मृत झालेल्या वकिलाचे नाव आहे.
ऍड. शिंदेंचे कार्यालय काळेवाडी परिसरात असून ते तेथून अचानक बेपत्ता झाल्या बाबतची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात घरच्या लोकांकडून दाखल करण्यात आली, पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच ही खळबळजनक बाब प्रकाशझोतात आली आहे, शिंदेंची हत्या की आणखी काय याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत, थर्टी फस्टला दुपारी ऍड. शिवशंकर शिंदे हे त्यांच्या कार्यालयातून बेपत्ता झाले होते, त्यांच्या परिवाराकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
त्यानंतर कुटुंबियांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली, पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काही तास उलटून गेल्यानंतर ऍड. शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र-तेलंगणा बॉर्डरवर मदनुर येथे आढळून आला असून त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे,दरम्यान, ॲड. शिंदेंच्या कार्यालयामध्येच त्यांची एका अज्ञाताशी झटापट झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे, कार्यालयामध्ये तुटलेली बटन आणि रक्त आढळून आलं आहे, अपहरण आणि त्यांनंतर हत्या झाली काय असा संशय देखील व्यक्त करण्या असून पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहेत शाखेच्या पथकांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेजव्दारे देखील तपास करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.