प्रतिनिधी- स्वप्नील कदम
लोणी काळभोर,( कदम वाकवस्ती) दि. ५ जानेवारी: विषबाधेमुळे रुग्णाच्या शरीरात संपूर्ण ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यामुळे मरणाच्या दारावर पोहचलेल्या रुग्णाला विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवनदान दिले.
लोणी काळभोर (कदम वाकवस्ती) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये पहाटे ३ च्या सुमारास ७४ वर्षीय पुरूष रुग्णाला दाखिल करण्यात आले. या रुग्णाला अचानक तीन वेळा उलट्या झाल्या. तसेच श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे हाता पायाचे बोटे काळे पडलेले होते. त्यानंतर विश्वराज हॉस्पिटचे डॉ. नामदेव जगताप, आयसीयू विभाग प्रमुख डॉ. विजय खंडागळे आणि आपातकालिन विभाग प्रमुख डॉ. सचिन कातकडे या डॉक्टरांच्या टीम ने व्हेंटिलेटर द्वारे त्या रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री माहिती नसलेल्ेय विष प्राशन केले. त्याच वेळी रुग्णाचा ए बी जी म्हणजेच धमन्यातील रक्ताचे ऑक्सिजनचे प्रमाणाची तपासणी केले. त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यामध्ये मिथेमोग्लोबिनिया नावाची विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीम ने अर्ध्या तासामध्ये आजाराचे अचूक निदान केले. तसेच योग्य उपचार सुरू करून पुढील दोन ते तीन तासांमध्ये त्या रुग्णाला फरक जाणवला. त्यामुळे रुग्णाच्या ऑक्सिजनचे प्रमाण सुधारायला लागले. पुढील दिवशी रुग्णाचे व्हेंटिलेटर बंद करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे व विश्वराजा हॉस्पिटलच्या योग्य नियोजनामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी रूग्णाच्या परिजनांनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड व त्यांच्या टीमचे आभार मानले.