पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
पुणे जिल्ह्यात दिनांक १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये झालेल्या खर्चाचा हिशोब सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायत निवडणूक लढवत असणाऱ्या सर्व उमेदवारांना देण्यात आल्या होत्या, 20 जानेवरी पर्यंत खर्च सादर केला नाही तर त्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार आहे यामुळे सर्व सदस्यांचे टेन्शन वाढले आहे.
२० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे, निवडणूक खर्च पुढील नऊ दिवसांत सादर न केल्यास निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी दिला आहे.
त्यामुळे सदस्य आणि सरपंच पदासाठी कसल्याही परिस्थीतीत जिंकून येण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केला होता,मात्र आता तो खर्च कुठे ,किती,व कसा केला याचे आकडे जुळवता जुळवता ४२९३ उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे,त्यामुळे सर्वच सदस्यांची खर्चाचे आकडे जुळवण्यासाठी पळापळ सुरू आहे.
ज्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब अद्याप सादर केला नाही, त्यांनी तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे,अन्यथा निवडून आलेले उमेदवार अपात्र होतील असेही सांगण्यात आले आहे.