पुणे

शिवशाही एस टी बसला चौफुला येथे रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने दगड मारून फोडली काच, यवत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

दौंड ता, १७ जानेवारी २०२३ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव चौफुला पुणे सोलापूर महामार्गाने जात असताना स्वारगेट तुळजापूर एस टी महामंडळाच्या शिवशाही बसला अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळी दगड मारुन डाव्या बाजुची काच फोडली, एस टी महामंडळ शिवशाही बस क्र, एम एच ०६ बी डब्ल्यू ४४०९ वरील चालक, संदिप प्रताप भोसले, वय ४२ रा, रानांद गाव ता, तुळजापूर जिल्हा सोलापूर यांनी दि १८ जानेवारी २०२३ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमा विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अहवाल ५६ / २०२३ एनसीआर तक्रार करण्यात आली आहे.

एस टी महामंडळाच्या स्वारगेट ते तुळजापूर शिवशाही बस ही स्वारगेट वरून पुणे सोलापूर हायवे रोडने तुळजापूर कडे जात असताना केडगाव चौफुला ता दौंड हद्दीतील एच पी पेट्रोल पंपा समोर अज्ञात इसमाने चालत्या बसला दगड मारुन बसची काच फोडली, दि,१७ जानेवारी २०२३ रोजी रात्री ११:४५ वा. ही घटना घडली, स्वारगेट तुळजापूर शिवशाही बस मधिल प्रवासी व चालक बॅच नं, ३६४३ संदीप प्रताप भोसले, वाहक बॅच नं, २२७१७ शिवदास दिगंबर स्वामी या कर्मचाऱ्यास कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र चालकास दगड लागला असता तर मात्र मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली असती, असे प्रवाशांनी पोलिसांना सांगितले.

घटना घडल्यानंतर लगेच एसटी महामंडळाच्या शिवशाही बस वाहक चालकांनी तत्काळ आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सदर प्रकरणाची माहिती दिली व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्काळ दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याची विनंती केली, चालक व वाहक हे यवत पोलीस स्टेशन येथे रात्री थांबले व दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायदेशीर कामकाज पूर्ण करून एसटी बस घेऊन तुळजापूर कडे रवाना झाले,पुढील तपास येवत पोलिस करत आहेत.