पुणे

पुण्यातील वारजे भागात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या गुंडावर आयुक्तांची मोक्का अंतर्गत कारवाई…!

पुणे:प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे : वारजे भागात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या गुंड कार्तिक इंगवले याच्यासह तीन साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले,पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी गेल्या महिनाभरात शहरातील सहा गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई केली आहे.

 

कार्तिक संजय इंगवले (वय २०), सनी बाळू शिंदे (वय २१), वैभव दत्तात्रय भाग्यवंत (वय २४, तिघे रा. रामनगर, बापुजीबुवा चौक, वारजे) अशी या गुंडांची नावे आहेत, या प्रकरणात एकाला अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, इंगवलेने गेल्या महिन्यात वारजे भागात एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील रोकड लुटली होती, दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळीबार केला होता.

इंगवले याच्याविरोधात लूट, खंडणी, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत, पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर करण्यात आला,या प्रस्तावास डहाळे यांनी मंजुरी दिली.