पुणेहडपसर

श्री वामन भुरे यांची अध्यक्ष पदी निवड

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या म्हणजे ECAM च्या अध्यक्ष पदी वामनराव भगवान भुरे, पुणे तर महासचिवपदी  देवांग ठाकूर, नाशिक तसेच संचालक पदी रघुवीर पाटील, धुळे. रावसाहेब रकिबे, नाशिक. उमेश रेखे, मनोहर शहाणे,  अमित गरुड, अहमदनगर. राजेंद्र सिन्नरकर, पुणे. यांची निवड झाली आहे. इंटरनॅशनल कनवेन्स सेंटर हॉल, स्टॉक एक्सचेंज टॉवर, मुंबई येथे झालेल्या संस्थेच्या 97 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. या संघटनेची स्थापना स्वतंत्र पूर्वी इसवी सन 1925 साली काही विद्युत व्यवसायिकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्या करिता मुंबई मध्ये करण्यात आली आहे. हिचा विस्तार पुढे महाराष्ट्र भर झाला आहे. संस्था आपले शंभरावे वर्ष पुढील वर्षी साजरे करत आहे. या कालावधीत संस्थेच्या अध्यक्ष पदाचा मान वामनराव भुरे यांच्या रूपाने पुण्याला आणि प्रथमच मिळालेला आहे.

सभासद आणि विद्युत ग्राहक यांना सतत येणाऱ्या अडचणी शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी, तसेच विदधूत सुरक्षा, इलेक्ट्रिकल अपघात कमी करण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करणे, शाळेतील मुलांना रस्ते वाहतूक याप्रमाणे “विदधूत सुरक्षा” याबद्दल जनजागृती करणे, यासाठी प्राधान्य देणे, ही कामे प्रामुख्याने करण्यावर भर देण्याचा मनोदय भुरे यांनी व्यक्त केला. भुरे मूळचे बारामती येथील असून व्यवसाया निमित्ताने हडपसर पुणे येथे स्थायिक झाले आहेत. व्यवसायाबरोबर सामाजिक कामात आवड असल्यामुळे, सामुदायिक विवाह सोहळे, जवळपास एक हजारापेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह यामध्ये लावण्यात तसेच रोटरीच्या क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करण्यात त्याचा सतत हिरारीने सहभाग राहिला आहे.