प्रतिनिधी – स्वप्नील कदम
लोणी काळभोर – डॉ,अदिती कराड आणि हॉस्पिटलच्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. डॉ अदिती कराड यांनी हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ आणि अधिकारी वर्ग याना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मार्गदर्शन केले.
विश्वराज हॉस्पिटल ही पूर्व हवेली मधील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा पुरवण्याच्या हेतूने डॉ. अदिती कराड यांच्या उत्कटतेतून जन्मलेली चळवळ आहे. डॉ. अदिती कराड यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, विश्वराज हॉस्पिटलचा आपल्या परिसरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी निर्धारपूर्वक प्रवास सुरू आहे
या प्रजासत्ताक दिनी आपल्या कामगार वर्गाला मौलिक मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे,त्यांना ओळखणे आणि विशेषत: आपल्या मोठ्या युवा लोकसंख्येच्या क्षमतेचा उपयोग करून आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी सक्रियपणे कार्य करणे महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, भारतीय सैन्याच्या संरक्षणाक्षेत्रामधील मौलिक योगदानाबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे, त्यामुळेच आपण देशात सर्व सण शांततेत ,सुरक्षितेत आणि आनंदाने साजरे करतो .भारत झपाट्याने विकसित होत आहे तसेच जागतिक अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानामध्ये आपला ठसा उमटवत आहे, आरोग्यक्षेत्रात येत असणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सध्याच्या आधुनिक युगात उपचारक्षेत्रात येऊ घातलेले अद्ययावत तंत्रज्ञान व उपचारपद्धती परिसरातील सर्वसामान्य वर्गाला उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य आहे.
रुग्णालये, दवाखाने आणि आरोग्य सेवा प्रदात्यांच्या वाढत्या संख्येसह भारतातील आरोग्य सेवा ह्या उत्तमोत्तम होत आहेत या विस्तारामुळे वैद्यकीय सेवा आणि उपचारांच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे, ज्यामुळे देशाच्या सर्व भागांमध्ये आरोग्यसेवा अधिक सुलभ बनली आहे.
सर्व नागरिकांना त्वरित,आधुनिक आणि गुणवत्ता पूर्वक परवडणारी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे या भूमिकेतून विश्वराज हॉस्पिटल मागील ६ वर्षे कार्यरत आहे. “आज पर्यंत आपणास रुग्णसेवेत मिळालेले यश हे केवळ आणि केवळ गुणवत्ता आणि समर्पणाच्या संस्कृतीतून आले आहे हे त्यांनी विशेष नमूद केले . सध्या विश्वराज हॉस्पिटल मध्येअँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी,बायपास सर्जरी तसेच रिनल ट्रान्सप्लांट(किडनीप्रत्यारोपण ), आय वि एफ (कृत्रिमरीत्या गर्भधारणा )सारखे अद्ययावत उपचार यशस्वीरीत्या सुरु आहेत.समृद्ध समाज, विकसित राज्य आणि बळकट अर्थव्यवस्था असणाऱ्या देशासाठी नागरिकांचे निरोगी राहणे हे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या भाषणाचा शेवट करताना त्यानी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक वंदनीय प्रा . डॉ .विश्वनाथ कराड सर याच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त दि.३ फेब्रुवारी ते दि. ५ फेब्रुवारी दरम्यान भव्य आरोग्य शिबीर आयोजित करत असल्याचे जाहीर केले सदर शिबिरात नामवंत चॅरिटेबल संस्थेच्या साहाय्याने ECG ,BMI, BSL यांसारख्या प्राथमिक तपासणी विनामूल्य करणार असून, स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी कन्सल्टेशन केवळ रु.१०० मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे तसेच विविध तपासण्यांवरती व ठराविक शस्त्रक्रियांवरती ४०% पर्यंत सूट देण्यात येणार आहे. एक कल्पक व्यक्तिमत्व, प्रेरणादायी डॉक्टर आणि दूरदर्शी नेत्या, डॉ. अदिती कराड या विश्वराज हॉस्पिटल आणि वर्ल्ड पीस स्कूल आळंदी, लातूर, इंदोरच्या कार्यकारी संचालिका आहेत. त्या माईरच्या एमआयटी पुणे येथे सदस्य विश्वस्त आणि संयुक्त महासचिव- या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.