प्रतिनिधी -स्वप्नील कदम (८४२११६७५०९)
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन चे हद्दीमध्ये सन २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा खून भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन करणेत आला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोरील गोळीबारामध्ये तीघांचा जिव गेला होता. सदर घटनेचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ५७१ /२०२१ भा.दं.वि.क. ३०२,३०० १२० व ३४ भा. ह. का. क. ३ (२५) ५ (२७) क्रिमीनल लॉ अॅमेन्टमेंट अक्ट क. ३ व ७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चेकलम ३ (१) (i). ३ (२) ३ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.. सदर गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खुन खटल्यातील मुख्य आरोपींनी शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आल्यानंतर त्यांचे जवळचे मित्रांना ( रेकॉर्डवरील गुन्हेगारांना) काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता.
सदरची बातमी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीसांना मिळाली होती. त्यावर मागील काही दिवसांपासुन सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस आरोपीतांचा शोध घेत होते. दि. २८/०१/२०२३ रोजी लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे पो. शि. निखील पवार यांना मिळालेल्या खात्रीशिर बातमीवरून लोणीकाळभोर पोलीस स्टेशन ने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दत्तवाडी रोड, सरकारी दवाखान्याजवळ ऊरुळीकांचन, पुणे याठिकाणी सापळा रचुन अग्निशस्त्र व तिक्ष्ण हत्यारासह दोन आरोपींना शिताफीने पकडले. सदर सापळा कारवाई दरम्यान आरोपीचे अंगझडतीमध्ये त्यांचेकडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस एक धारदार चाकु अशी चालक हत्यारे जप्त करणेत आली आहेत. सदर प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ९२ / २०२३ भा. हत्यार कायदा कलम ३ (२५) म. पो. का. क. ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन त्यामध्ये आजपावेतो आरोपी नामे १) आशिष अनिल वरगडे वय २२ वर्षे रा. आश्रमरोड, उरुळीकांचन, पुणे २) उध्दव राजाराम मिसाळ वय ४५ वर्षे रा. दत्तवाडी, उरुळीकांचन, पुणे ३) सुरज सतिष जगताप रा. गणेशवाडी, वरवंड, पुणे ४) किशोर ऊर्फ शिवा छ साळुंके रा. बोरीपार्थी, केडगाव, पुणे यांना अटक करणेत आली आहे. नमुद आरोपींची मा. न्यायालयाकडुन ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेणेत आली आहे. सदर गुन्हयाचे तपासामध्ये वरिल हकिकत निष्पन्न झाली आहे. गुन्हयाचे ‘तपासामध्ये यामध्ये आणखी काही आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत आहे.
सन २०१५ मध्ये कुविख्यात गुंड व वाळुमाफिया आप्पा लोंढे याचा खुन आरोपी नामे १) संतोष भिमराव शिंदे रा. शिंदवणे ता. हवेली जि. पुणे २) निलेश खंड सोलनकर रा. डाळींब दत्तवाडी, ता. हवेली जि. पुणे ३) राजेंद्र विजय गायकवाड रा. शिंदवणे ४) आकाश सुनिल महाडीक रा. उरुळीकांचन ५) विष्णु यशवंत जाधव रा. माळवाडी ६) नागेश लक्ष्मण झाडकर रा. उरुळीकांचन यांनी केला होता. त्यांना मोका केरा मध्ये शिक्षा लागल्याने ते अद्याप जेलमध्ये आहेत. सदर केस मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार व बाळुतस्कर याने आरोपींना शिक्षा होऊ नये म्हणुन प्रयत्न केला या संशयावरून दि. २२/१०/२०२१ रोजी संतोष जगताप याचे मर्डर केस मधील आरोपी नामे विष्णु यशवंत जाधव याने कट रचुन संतोष जगताप याचा खुन केला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोर झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप व इतर दोघांचा खुन झाला होता. सदर घटनेमुळे त्यावेळी संपुर्ण पुणे शहर हादरले होते.
सध्या संतोष जगताप याये खुन खटल्याची सुनावणी सुरू होत आहे. अशावेळी सदर केसमधील मुख्य साक्षीदारांच्या साक्षीवर यातील सर्व आरोपींना फाशी किंवा जन्मठेप अशी शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे ही गोष्ट आरोपींना ज्ञात असल्याने त्यांनी मुख्य साक्षीदारांना संपवुन टाकण्याचा कट रचला होता. त्याप्रमाणे त्यांनी कोर्ट पेशीचेवेळी मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देवुन अटक आरोपीना त्यांचे बाहेर असलेल्या हस्तकांमार्फत अग्निशस्त्र पुरवले असल्याची बातमी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एल. चव्हाण व त्यांचे टीम ला मिळाली होती. त्यावर पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णक, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर श्री बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री सुभाष काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अमित गोरे यांचे पथकातील पो. हवा. नितीन गायकवाड, सुदर्शन बोरावके, मो.ना. अमित साळुंके, पो. ना. देवीकर, पोना नागलोत, पोना जाधव, पोशि गणेश गायकर, पोशिविर, पोशि शिरगीरे, पोशि कुदळे, म.पो.शि. फणसे यांनी बातमीप्रमाणे सापळा रचुन यशस्वी सापळा कारवाई केली व आरोपीतांना अटक करुन त्यांचा कट उधळुन लावला आहे. अटक आरोपींनी सदर गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण करीत आहेत.