पुणे

“जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती साठी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेतर्फे शिबिर” – “हडपसर मधील पत्रकारांची मोफत कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी”

चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या निमित्ताने जनजागृती व्हावी यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेतर्फे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पत्रकारांचा समाजाशी फार जवळून संबंध येतो. समाजाचे प्रबोधन करण्याचे आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम पत्रकार सहजतेने करू शकतात.

तब्बल ५२ पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबीयांची दंत तपासणी व मुख कर्करोगाचे प्राथमिक स्क्रीनिंग यावेळी करण्यात आले. मौखिक आरोग्य जपण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखा यांच्या तर्फे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

VELSCAN(Canada) च्या डॉ. तृप्ती घोलप यांनी मुख कर्करोगाची लक्षणे लक्षात आणून देणारा स्कॅनर उपलब्ध करून दिला तसेच मुख कर्करोग संबंधी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद भन्साळी यांनी प्रस्तावना केली तर सचिव डॉ. प्रतीक राऊत यांनी आभार प्रदर्शन केले. माजी अध्यक्ष डॉ. जयदीप फरांदे, कोषाध्यक्ष डॉ. रोहित गांधी आणि डॉ. शंतनु जगदाळे यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात डॉ. अपूर्वा लोढा, डॉ. अनिकेत कुगांवकर, डॉ. विक्रम हरीपुरे, डॉ. अश्विनी दळवी,डॉ. नितीन सपाट, डॉ. अक्षय राऊत, डॉ. स्नेहल साळवी, डॉ. दिशा प्रजापती, डॉ. श्वेता बोरावके, डॉ. श्वेता दाभोळ, डॉ. अर्चना चव्हाण, डॉ. प्रीती सेठणा, डॉ. अंकिता बोंडगे, डॉ. सोनी गुल्हाने यांनी तपासणी केली.

डॉ.फरांदे डेंटल क्लिनिक, गाडीतळ, हडपसर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.