पुणे

पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध्य गुटखा विक्रीविरोधात पोलीस कारवाई सुरू, पुणे शहर आणी लोणावळ्यातील कारवाईत 48 लाखांचा गुटखा जप्त…!

पुणे: प्रतिनिधी( रमेश निकाळजे )

पुणे शहर तसेंच जिल्ह्यातील अनेक भागात बेकायदेशीरित्या गुटखा विक्री, तसेच वाहतूक करणायांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, लोणावळा परिसरात गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले आहे, या कारवाईत पोलिसांनी गुटखा, तसेच ट्रक, असा मिळून २५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना लोणावळा परिसरात कुसगाव गावाजवळ कर्नाटकातील ट्रक येणार असून, ट्रकमध्ये गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली, त्यानंतर गुन्हे अन्वेशन पथकाने तेथे छापा टाकून ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये पोत्यात भरून ठेवलेल्या गुटख्याच्या पुड्या व बॉक्स मोठ्या प्रमाणात आढळून आले.

पोलिसांनी गुटखा भरलेली ३४२ पोती, तसेच ट्रक जप्त केला असून या प्रकरणी ट्रकचालक मोहम्मद खलील जमाल अहमद शेख (वय ४०, रा. लालगिरी, अहमपूर, जि. गुलबर्गा, कर्नाटक), याला व नसरुदीन बुन्हानसा खडखडे (वय ३५, रा. खडखड गड़ी, डुबलगुडी, जि. बिदर, कर्नाटक) यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश पट्टे, उपविभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पो लीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक शुभम चव्हाण, प्रकाश वाघमारे, युवराज बनसोडे, अमोल शेंडगे आदॉनी ही कारवाई केली, दरम्यान, पुणे पोलिसांनी शहरातील गुटखा विक्रेत्यांविरोधात पुणे शहर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे,त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी पुणे शहर परिसरातून २२ लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केले असल्याचे सांगण्यात आले.