पुणे:प्रतिनिधी:( रमेश निकाळजे )
सालाबाद प्रमाणे सोमवार दि. १३/०२/२०२३ रोजी सकाळी १०:३० वा. कदम वाक वस्ती येथील मधुबन लॉन्स याठिकाणी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाची सुरुवात लोणीकाळभोरच्या विद्यमान सरपंच माधुरीताई काळभोर तसेंच कदम वाक वस्ती चे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेंच सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजानाने करण्यात आली.
बाल आनंद मेळाव्याच्या कार्यक्रमाला जलसंपदा विभाग मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांचे सचिव सचिन खंडाळे साहेब , हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर तसेंच माजी उपसभापती युगन्धर काळभोर, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील काळभोर, उपसरपंच राजश्री ताई काळभोर,ग्रा.पं सदस्य नासीर खान पठाण,समिंता लोंढे, कोमल काळभोर,स्वप्नेश काळभोर,भारतीताई काळभोर, शिवसेना शिंदे गट पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर, सामाजिक कार्यकर्ते सतीश काळभोर, लोणीकाळभोरचे माजी सरपंच राजाराम काळभोर, राजेंद्र काळभोर, पर्यवेक्षिका नायर मॅडम, शीद मॅडम, सस्ते मॅडम ,पत्रकार सुनील शिरसाठ, रमेश निकाळजे, स्वप्नील कदम, तसेंच लोणीकाळभोर व कदम वाक वस्ती ग्रामपंचायत मधील अंगणवाडीच्या सेविका आणी मदतनीस तसेंच बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळमेळाव्याच्या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च हा लोकसहभागातून करण्यात आल्याचे पर्यवेक्षिका नायर मॅडम यांनी सांगितले कार्यक्रमासाठी हवेलीचे माजी सभापती अनिल टिळेकर यांनी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले, तसेच माजी सरपंच व विद्यमान ग्रा.पं सदस्य नंदू पाटील काळभोर यांनी ५००१/- रुपये दिले, तसेंच मा.ग्रा.पं सदस्या वंदनाताई सचिन काळभोर यांनी २०० टिफिन बॉक्स कार्यक्रात डान्स मध्ये भाग घेतलेल्या मुलांना वाटप केले, सुयश हॉस्पिटलचे डॉ. केतन कुंभार यांनी १०० वॉटर बॉटल लहान मुलांसाठी दिल्या, शिवसेना शिंदे गट संघटक पुणे जिल्हा निलेश काळभोर यांनी २०० मुलांना ड्रॉईंग बुक चे वाटप केले, दिलीप काळभोर यांनी २० शॉल व श्रीफळ दिले,विद्यमान ग्रा.पं.स.आकाश काळभोर यांनी १५ शॉल व श्रीफळ दिले, तसेंच सा.कार्यकर्ते विजय थोरात यांनी १००१ रुपये कार्यक्रमासाठी दिले,आनंदी फाउंडेशन तर्फे २०० मुलांना प्रशस्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, तसेंच लोणीकाळभोर माळीमळा येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी २०० बिस्कीट पुडे मुलांना दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका नायर मॅडम यांनी केले व सूत्र संचनल सेविका पल्लवी निकाळजे व मिनाक्षी राखपसरे यांनी केले सर्व गाणी व डान्स ऑपरेट करण्याचे काम चंद्रकला काळभोर व अश्विनी फलटणकर यांनी केले,अशा पद्धतीने कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने व मोठ्या आनंदाने पार पडला, आलेल्या सर्व मान्यवरांचे व पालक यांचे स्वागत व आभार रोहिणी काळभोर यांनी केले.