पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली, त्यावेळी कावेरी कुंजीर हवेली पंचायत समिती सदस्य, सुनीता ताई धुमाळ माजी सरपंच,सोनाली ताई जवळकर सरपंच, अजय कुंजीर उपसरपंच कुंजीरवाडी,भारत निगडे,पिंटूशेठ तुपे,लता बुदळे सारिका भोंडवे,आदेश जाधव,शामराव बोरकर,संग्राम कोतवाल हे सर्व मान्यवर त्यावेळी मंचावर उपस्थित होते.
त्यावेळी सुहास मोरे (विस्तार अधिकारी) उद्धव खेडेकर,डॉ शिल्पा दलाल यांना बिटच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले असे सस्ते मॅडम यांनी सांगितले, तसेंच आदर्श कार्यकर्ती व मदतनीस हा पुरस्कार श्रीमाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात आला.
बाल आनंद मेळाव्यात बिटमधील ३ ते ६ वयोगटातील बालकांनी विविध प्रकारची गाणी,भाषणे तसेंच पोवाडे सादर केले, गाणी व पोवाडे सादर करत असताना त्याला शोभेल अशी वेशभूषा केल्यामुळे ते गाणे व पोवाडे सादर करत असताना सर्वच बालके केलेल्या वेशभूषेमुळे अतिशय सुंदर दिसत होती, प्रत्येक बालकाने गाण्यावर नृत्य करताना आपली चुणूक दाखवली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ए.ए.सस्ते यांनी केले तर प्रास्ताविक जयश्री कुंजीर यांनी केले आणी आलेल्या सर्व मान्यवर व पालक यांचे आभार प्रदर्शन वैशाली नाईक यांनी मानले.