पुणे

जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन जिल्ह्यातून 20 संघ सहभागी

पुणे (प्रतिनिधी )

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
रयत सेवा प्रतिष्ठान पुणे संचलित,
रॉयल स्पोर्ट्स अँड कल्चरल अकॅडमीच्या वतीने
भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन दिनांक १८ व १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
लोटस गार्डन इंग्लिश मिडीअम स्कूल, वडकी येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य अनिल यादव यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी रयत सेवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, संस्थेच्या सचिव शुभलक्ष्मी चंद्रकांत भोसले व लोटस गार्डन इंग्लिश मिडीअम स्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली खामकर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

आंतरशालेय या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 20 हून अधिक संघ सहभागी झाले आहेत.
कबड्डी हा खेळ पुणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अतिशय आवडीने खेळला जातो पारंपारिक खेळ खेळत असताना मुलांना शारीरिक तंदुरुस्ती या खेळातून मिळते तसेच अशा स्पर्धांमधून सुप्त गुणांना वाव मिळतो असे रयत सेवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.