शहर

जागतिक मराठीभाषा गौरव दिनी महाराष्ट्राबाहेर ज्येष्ठ मराठी कवीचा गौरव

गेली पंचवीस वर्षे हैदराबाद (तेलंगणा)येथे मराठी साहित्य, कलेचे जतन,संवर्धन करणारी “कलाभिषेक परिवार “
ही एक नामांकित संस्था .तिने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून दि.२७. २.२३रोजी मराठीतील ज्येष्ठ कवी,लेखक प्राचार्य सूर्यकान्त द.वैद्य(वय ८५ वर्षे ) यांचा “सायंतन ” हा कवितासंग्रह आणि त्यांच्या कवितांची समीक्षा आणि आस्वाद घेणारा ” अंतर्वेध ” हा ग्रंथ यांचा प्रकाशन सोहळा आयोजिला आहे.

प्रा .वैद्य यांनी आजवर आपल्या ललित व शास्त्रीय लेखनाचे मराठीला जे योगदान दिले त्याबद्दल त्यांना
“साहित्यगौरव पुरस्कार ” देऊन सन्मानित केले जाणार आहे. ह्या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या गायिलेल्या काही गीतांचा आणि कवितासादरणीकरणाचा मनोरंजक कार्यक्रमही आयोजिला आहे.

 

कार्यक्रम स्थळ
मराठी ग्रंथ संग्रहालय,कोटी,हैद्राबाद येथे सायंकाळी ६.३०. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अगत्याचे आवाहन संस्थेच्या सचिव सौ.सरोज घारापुरीकर यांनी केले आहे.