पुणे

लोणी काळभोर हद्दीतील वडकीत १ लाख,४० हजाराचा गांजा जप्त, लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर (पुणे) -लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विकणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. राजेशकुमार विजय (वय २३), राजकिशोर यादव (वय १९) रा. दोघेही सध्या गायकवाड वाडी रोड, सिध्दीविनायक पार्क शेजारी, सोनवणे यांचे गायी व म्हशीच्या गोठ्याच्या ठिकाणी वडकी ता. हवेली जि. पुणे (मुळ राहणार मोहनपुर, वैशाली, बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी . काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडकी (ता. हवेली) हद्दीतील सोनवणे यांचे गाई व म्हशीचे गोठयाचे ठिकाणी बेकायदेशीर आमली पदार्थ विक्री चालते अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुभाष काळे यांना एका खबऱ्याकडून मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या अनुशंधाने लोणी काळभोर पोलीस पथक मागील आठ दिवसांपासून सापळा रचुन त्यांचे संशयितांचे हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होते. गायकवाड वाडी रोड वडकी हद्दीत दोन इसम हातामधील पिशवीमधील गांजा विकत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार बुधवारी (ता. २२) रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दोन इसम सोनवणे यांचे गायी म्हशींचे गोठयाचे जवळ पोलीस पथकाने दोघांचा शिताफीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नाव व पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे नाव व पत्ता सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचकडे पांढऱ्या रंगाचे पशु आहार खाद्याचे पोत्यामध्ये हिरवट रंगाचा पाला (गांजा) खाकी रंगाचे चिकटपट्टीने गुंडाळलेली असे तीन बंडल व एका लाल व निळया रंगाचे कॅरीबॅगमध्ये सुट्टा गांजा असा १ लाख ४० हजार रुपयांचा एकूण १० किलो गांजा जप्त केला. तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे करीत आहेत.

सदरची कामगिरी शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उप-आयुक्त सो परिमंडळ-५ विकांत देशमुख, हडपसर विभाग सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदशनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, बोरावके, साळुंखे, जाधव, नागलोत, देवीकर, पवार, शिरगीरे, कुदळे, वीर, ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.