दोन टोळ्यांच्या भांडणातून कोयते काढून दहशत माजविण्याचा प्रयत्न
पुणे (रमेश निकाळजे )
ससून रुग्णालयाच्या आवारात हडपसर भागातील रामटेकडी परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांच्या भांडणातून एकमेकांवर कोयते उगारून शुक्रवारी दहशत निर्माण केली, या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेंच ससूनचा संपूर्ण स्टाफ यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले, मागील काही महिन्यांपासून पुणे शहरात कोयता गँगने अक्षरशः धुडगूस घातला असून त्यामुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण आहे, आतापर्यंत कोयता गँग ने चौकात, गल्लीत तसेंच रस्त्यावर धुडगूस घातला होता,परंतु आता मात्र गुंडागर्दीची हद्दच झाली चक्क गुंडांनी आता थेट ससून रुग्णालयाच्या आवारातच हातात कोयते घेऊन नंगानाच केल्याची घटना समोर आली आहे.
हडपसरमधील रामटेकडी परिसरातील सराईत गुन्हेगार असणाऱ्या दोन टोळ्यांमध्ये शुक्रवारी दुपारी वाद झाला होता, त्यानंतर दोन्ही टोळ्यांमधील वादाचे रूपांतर मारामारीत झाल्यामुळे सर्व सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांनी पोलिस ठाण्यात पकडून आणले, तसेंच सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी दुपारी ससून रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी त्यांच्या बरोबर होते.
रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या (ओपीडी) बाहेर दोन टोळ्यांमधील सराईत गुन्हेगार पुन्हा समोरासमोर आल्यामुळे सराईतांच्या साथीदारांनी एकमेकांना शिवीगाळ करून एकमेकांना कोयत्याने वार करून दहशत पसरवली,
त्यावेळी ससून रुग्णालयाच्या आवारातील सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने सराईतांना ताबडतोप रोखण्याचा प्रयत्न केला,तरीही हाणामारीत तीन ते चार जण लोक जखमी झाले आहेत, पोलिसांनी या प्रकरणात दोन टोळ्यांमधील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केले असून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.