हडपसर,वार्ताहर. महाराष्ट्र शासन आणि इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि आकलन कौशल्य सुधारण्यासाठी राज्यात शासनाच्या शाळांमध्ये ‘ रीड टू मी’ या अँपचा वापर केला जातो. या उपक्रमांतर्गत इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये ‘ रीड टू मी’ चा वापर करून, वर्गात शिकवलेल्या इंग्रजी पाठाची उजळणी विद्यार्थी कशाप्रकारे करतात यावर एक सारांशरूपी व्हिडीओ बनवायचा होता. पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातून इयत्ता सहावीसाठी साधना विद्यालय हडपसर मधील वरद सुभाष साबळे या विद्यार्थ्याला प्रथम पारितोषिक मिळाले.
वरद साबळे या विद्यार्थ्याचा पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व साधना विद्यालय हडपसर यांच्यामार्फत सुवर्णपदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी डायटच्या प्राचार्या शोभा खंदारे,अधिव्याख्याता महेश शेंडकर, सौ. सुवर्णा तोरणे, “रीड टू मी” टीम चे संदीप मंडलिक,प्रणव पेंडसे उपस्थित होते.
वरद साबळे या विद्यार्थ्याला साधना विद्यालयातील “रीड टू मी ” विभागप्रमुख स्मिता क्षीरसागर, विषयशिक्षिका शीला गंधट यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद व आजीव सभासद बोर्ड सचिव, प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे, माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, आजीव सेवक अनिल मेमाणे या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.