पुणे

कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी गगनभरारी घ्यावी . प्राचार्य दत्तात्रय जाधव

हडपसर,वार्ताहर. 21 व्या शतकातील महिला सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहे.पुरूषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन कार्य करत आहेत.महिला कुटुंबाबरोबर देशाच्या विकासालाही हातभार लावत आहेत.महिलांचा आदर-सन्मान करणं,त्यांना कर्तृत्वाला संधी देणे गरजेचे आहे.महिलांनीही स्वतःला अबला न समजता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गगनभरारी घ्यावी. असे प्रतिपादन प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

संग्राम देवकाते ,यश कित्तूर,सुशांत शिंदे या विद्यार्थ्यांनी महिला दिनविषयक आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात अमृता माळवदे यांनी महिलादिनविषयक माहिती सांगितली.चित्रा हेंद्रे यांनी महिलादिनविषयक गीत सादर केले.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली पाटील यांनी केले.सूत्रसंचालन महेंद्र रणवरे यांनी केले.तर आभार सविता पाषाणकर यांनी मानले.