हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन प्रतिनिधी )
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये हडपसर कार्यक्षेत्रातून बाळासाहेब भिसे निवडणुकीस इच्छुक आहेत, या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून हडपसर व परिसरातील व्यापाऱ्याची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.
हडपसर मार्केट मध्ये सर्व व्यापारी बांधवांची पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणुकीला सामोरे जाण्याची मिटींग आयोजित केली होती या बैठकीमध्ये मार्केट मंडळाचे अध्यक्ष प्रमोद आण्णा बडदे, माजी स्विकृत नगरसेवक संजय शिंदे, नितिन आरु, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा शितल शिंदे, पंडित नेहरु भाजीपाला व्यापारी संघटनेचे सतिश भिसे, साहेबराव झांबरे, प्रेम आटोळे, राजु तुपे, श्रीमती विमल आरु, सचिन शेवाळे, मुबारक इनामदार, राजु बाजारे, प्रविण टिळेकर, आप्पा चव्हाण, मनोहर वाडकर, पवनशेठ धुमाळ, अजय लेंडे, बेबीताई चौधरी, जयश्रीताई यादव, माणिक काळे, मीना टिळेकर, अनिता केदारी आणि इतर सर्व मान्यवरांचा सहभाग होता.
या बैठकीमध्ये सतिश भिसे, सचिन शेवाळे, प्रमोद बडदे, श्रीमती विमल आरु यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आभार प्रमोद बडदे यांनी मानले.
कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली ची गेल्या वीस वर्ष प्रशासकिय कारभार संपुष्टात येऊन नव्याने संचालक मंडळ निवडणुका घोषित झालेल्या आहेत, या निवडणुकी मध्ये हवेली तालुक्यातील सात ग्रामपंचायत सदस्य आणि सात कृषी सोसायटीत सदस्य, दोन आडते व्यापारी प्रतिनिधी, आणि एक हमाल तोलणार सदस्य असे 17 प्रतिनिधी संचालक म्हणून निवडुन जाणार आहेत, या मंडळात व्यापारी आडते प्रतिनिधी च्या दोन जागेचे एकुण 13 हजार मतदान आहे, यापैकी आडत्यांचे मतदान 1400 आणि खरेदीदार भाजी विक्रेत्याचे 11 हजार 600 मतदान आहे. आज पर्यंतचा इतिहास पाहता या प्रवर्गातुन फक्त आडतेच निवडुन गेलेले आहेत, सदर मार्केट कमिटी मध्ये आडत्यांचे प्रश्न वेगळे आणि खरेदीदार व्यापाऱ्यांचे प्रश्न वेगळे असताना दोन वेगळे प्रतिनिधी असणे आवश्यक होते पण तसे न होता दोन्ही एकत्र लढावे लागते.सर्व सामान्य खरेदीदार व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदर प्रवर्गातुन इच्छुक आहे.
बाळासाहेब भिसे
अध्यक्ष – पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना – हडपसर
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना निवेदन…
संपुर्ण पुणे शहर पिंपरी चिंचवड परिसरातील भाजी मंडई, दुकाने, हातगाडी फेरीवाले या मध्ये व्यवसाय करत आहेत. तसेच मांजरी उपबाजार मधुन ही मोठा किरकोळ व्यापारी माल खरेदी करुन विक्री करतो आहे, यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी बाजार समिती मध्ये असणे आवश्यक आहे, जर व्यापारी प्रतिनिधींचे पॅनल आपल्या पक्षाच्या वतीने होणार असेल तर माझा सदर पॅनेल मध्ये विचार व्हावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केल्याचे बाळासाहेब भिसे यांनी सांगितले.