पुणे

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात एएमएम श्री- २०२३ शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न

ओंकार कदमला एएमएम श्री क्लासिक सीनियर- २०२३” चा किताब
      पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात संपन्न झालेल्या “एएमएम श्री क्लासिक सीनियर- २०२३” चा किताब ओंकार कदम याने तर “एएमएम श्री जुनिअर-२०२३” चा किताब संग्रामसिंग पाटील याने प्राप्त केला. “एएमएम श्री मेन्स फिजिक सिनिअर-२०२३” चा मान शिवम वडार तसेच “एएमएम श्री मेन्स फिजिक जुनिअर-२०२३” चा किताब रंजन धुमाळ या खेळाडूने मिळविला. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय खेळाडू कृष्णा कदम यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव बॉडी शो पोसिंग देत उपस्थितांची मने जिंकली.

 

या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू कृष्णा कदम, पोलीस निरीक्षक विश्वास ढगळे, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. प्रा. संजीव पवार उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक विश्वास ढगळे म्हणाले आरोग्य हीच सर्व श्रेष्ठ संपत्ती आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नित्य व्यायाम मेहनत करणे आवश्यक आहे.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध क्रीडास्पर्धांविषयी माहिती देत महाविद्यालयातील खेळाडूंचे कौतुक केले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :- “एएमएम श्री क्लासिक सिनिअर-२०२३” ओंकार कदम, “एएमएम श्री क्लासिक जुनिअर-२०२३” संग्रामसिंग पाटील, “एएमएम श्री मेन्स फिजिक सिनिअर-२०२३” शिवम वडार, “एएमएम श्री मेन्स फिजिक जुनिअर-२०२३” रंजन धुमाळ, “बेस्ट इंप्रूव्हड बॉडी बिल्डर” संजन जाधव, “बेस्ट अपकमिंग बॉडी बिल्डर” नामदेव धमुरे, सब कॅटेगिरी १४५ सेंटीमीटर ते १६० सेंटीमीटर गट- कार्तिक नागवडे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक- तन्मय भोसले, तृतीय क्रमांक- बालाजी शिरसाठ, १६० सेंटीमिटर ते १७० सेंटीमीटर गट प्रथम क्रमांक विभागून- नामदेव धूमरे, शिवा पांडे, द्वितीय क्रमांक विभागून- यश कुंभारकर, अमन शेख, तृतीय क्रमांक विभागून- प्रवीण भोईटे, अभिनंदन खन्ना, १७० सेंटीमीटर पुढील गट- प्रथम क्रमांक रंजन धुमाळ, द्वितीय क्रमांक गणेश लावंडे, तृतीय क्रमांक आदित्य गायकवाड.

 

सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा. अनिल मरे, प्रा. विवेक माने यांनी काम पाहिले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. एम. जे. खैरे, प्रा. संजीव पवार, डॉ. नामदेव भुजबळ, डॉ. नाना झगडे, डॉ. राजेश रसाळ, कॅप्टन धीरजकुमार देशमुख, प्रा. नितीन लगड, प्रा. एन. व्ही. खैरे, प्रा. काशिनाथ दिवटे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. प्रितम ओव्हाळ तर सूत्रसंचालन श्रीकृष्ण थेटे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अमोल गायकवाड, धीरज सोनवणे, राजेंद्र औटे, विशाल कोलते, स्वप्नील सोनवणे, अमोल कदम, अमन शेख यांनी केले.