प्रतिनिधी -स्वप्नील कदम
पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार, सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक व अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुदध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दशहत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५ श्री विक्रांत देशमुख यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करणे बाबतचे आदेश देऊन सदर कारवाई बाबत मार्गदर्शन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील अधिकाऱ्यांना केले. त्यानंतर दत्ताजय चव्हाण, वपोनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांनी सदर अवैध घदयांबाबत माहिती घेतली ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही अशा ठिकाणी जंगलामध्ये निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम राजरोसपणे चालू असलेबाबत त्यांना माहिती मिळाली..
लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पो.ना ६४८२ देवीकर यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, भवरापुर गावचे हद्दीत टिळेकर वस्ती जवळ ओढ्यालगत आडोशाला, ता. हवेली, जि.पुणे येथे एक पुरुष हा जमिनीत घेतलेल्या खड्यामध्ये गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन आपले जवळ बाळगुन लाकडी काठीने ढवळत आहे सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील अधिकारी, अंमलदार यांचे सोबत चर्चा करून नियोजनबद्ध पथक तयार करून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात भवरापुर गावचे हद्दीत टिळेकर वस्ती जवळ ओढ्यालगत आडोशाला, ता. हवेली, जि.पुणे येथील अवैध गावठी हातभट्टी दारु भट्टीवर धडक कारवाई करुन भवरापुर गावचे हद्दीत टिळेकर वस्ती जवळ ओढ्यालगत आडोशाला, ता. हवेली, जि. पुणे येथील गावठी हातभट्टीवर कारवाई करून जमिनित खड्डे करून अंदाजे दोन हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पत्र्याचे भांडे असे अंदाज २२०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट केला.
याप्रमाणे कारवाई करून अंदाजे एकूण २२,०००/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा व दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान गावठी हातभट्टी चालवणारे इसम नामे अरविंद रामलाल राजपुत, वय ५४ वर्षे, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि.पुणे यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पोलीस करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगीरी रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पो.हवा ४३२ गायकवाड, पो.ना ७३३५ नागलोत, पो.ना ६४८२ देवीकर पो. शि. १२००५ शिरगीरे, पो.शि ४७११ कुदळे, पोशि पवार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.