शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसांनिम्मित शिवसेना पुणे शहरप्रमुख नानासाहेब भानगिरे यांच्याकडून कर्णबधिर मुलीच्या कानाच्या ऑपरेशनसाठी ६.२५ लक्ष रुपयांचा मदतनिधी,अनाथ बालकांना स्नेहभोजन,निराधार वृद्ध महिलाना किराणा धान्य यांचे वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नरेशजी म्हस्के यांच्या वाढदिवसांनिम्मित रोहन खैरे या कष्टकरी नागरिकाच्या ४ वर्षांच्या जन्मतः कर्णबधिर मुलीला कानाच्या ऑपरेशनसाठी ६.२५ लक्ष रुपयांचा निधी म्हस्के याच्या हस्ते देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांचा निधी नाना भानगिरे यांनी मिळवून दिला याबद्दल रोहन खैरे यांच्या कुटुंबीयांनी नाना भानगिरे यांचे भावनिक होत आभार मानले,नरेशजी म्हस्के यांनी नाना भानगिरे यांचे वाढदिवसानिम्मित विविध उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक केले,
शंभूराजे अनाथालयात केक कापून आणि बालकांना मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम २४ मार्च शुक्रवारी संपन्न झाला.यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे,शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे,उपशहर प्रमुख संतोष रजपूत,पुणे शहर युवा सेना उपशहरप्रमुख काका पवार,विधानसभा युवा अध्यक्ष योगेश जोशी, पुणे शहर महिला आघाडी उपसंघटिका अयोध्या आंधळे,सारिका पवार,प्रभागध्यक्ष राजू ढेबे,बबन आंधळे,विभागअध्यक्ष सचिन तरवडे,राजू काळे,उद्योगपती सचिन भानगिरे,बारवकर काका,अक्षय तारू आदी मान्यवर पदाधीकारी उपस्थित होते.
मातोश्री हौसाबाई निराधार वृद्ध महिला आश्रमात शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या वतीने नरेशजी म्हस्के यांच्या वाढदिवसांनिम्मित १ महिना पुरेल इतका किराणा,धान्य मान्यवर आश्रमाच्या अध्यक्षा आरपीआय पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा शशिकला ताई वाघमारे आणि मराठी पत्रकार संघ शहर अध्यक्ष राकेश यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हासभाऊ तुपे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
तर नगरसेवक मारुती आबा तुपे,आरपीआय शहर अध्यक्षा शशिकला वाघमारे आणि शिवसेना नेत्यांनी नाना भानगिरे यांचे अभिनंदन करत नरेश म्हस्के यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित दाभाडे,अमोल जगताप,राजू गवळी,गणेश साळुंके आणि नाना भानगिरे टीमने परिश्रम घेतले.