पुणे

PUNE CRIME : “पूर्व वैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला – हडपसर पोलिसांकडून आरोपी चार तासात गजाआड”

:- धारदार शस्त्र घेऊन झाला होता दोघांवर हल्ला 

:- हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

हडपसर येथील वैभव टॉकीज शेजारी गजबजलेल्या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून खूनाचा बदला घेण्यासाठी दोघांविरुद्ध प्राण घातक हल्ला चढवण्यात आला. घटनेच्या चार तासाच्या आत हडपसर तपास पथकाकडून 4 आरोपींना जेरबंद करून धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे.

 

दिनांक २९/०३/२०२३ रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रदीप दिनकर देवकर व जखमी शुभम कृष्णाराव भोडे हे वैभव थिएटर, जवळ ३२ नंबर हडपसर पुणे येथे चहाचे टपरीवर सिगारेट ओढण्यासाठी जावून परत रिक्षाने, सरकारी ३२ नंबर शाळा हडपसर पुणे येथे जवळ आल्यावर रिक्षा समोर दोन टू व्हीलरवर डबल सीट वर सागर घायतडक, ओम ऊर्फ पिंटु भंडारी, राजन लावंड, मेघराज शितोळे हे आले. त्यांनी त्यांच्या हातामध्ये धारधार शस्त्र घेवून, येवून त्यांनी अनिकेत घायतडकचा झालेल्या खुनाचा राग मनामध्ये धरून फिर्यादी यांना रिक्षाच्या बाहेर ओढुन काढले. त्यांनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शुभम भोंडेला त्यांनी त्यांच्याजवळील धारधार शस्त्राने मारहाण करुन, आपआपले टुव्हिलर गाड्यांवर तेथून निघून गेले.

त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशनला गु.र.नं ३९५ / २०२३ भादंवि कलम ३०७,३४९, ३२३, ५०४, ५०६, ३४, सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हडपसर पोलीस ठाणेकडील तपासपथकातील अंमलदार पोशि प्रशांत दुधाळ यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती घेवून तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मुंढवा ब्रिज येथे सापळा रचून आरोपी नामे १) पिंटू विनोद भंडारी वय २१ वर्ष रा. सर्वे नंबर १६५ काळुबाई मंदिराजवळ माळवाडी हडपसर पुणे २) राजन रघुनाथ लावंड वय २१ वर्ष रा. सर्वे नं. १६५, यश हॉस्पीटल समोर माळवाडी हडपसर पुणे ३) ऋषीकेश प्रविण शितोळे वय १९ वर्ष रा. सर्व नं १६५ हडपसर पुणे. ४) रोशन हनुमंत सोनकांबळे वय २१ रा. मांजरी फार्मजवळ, मांजरी पुणे यांना गुन्हा दाखल झाल्यापासून ४ तासाचे आत अटक केली आहे.

 

सदरची कामगिरी ही रितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, मा.सह पोलीस आयुक्त , पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व विक्रांत देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, दिगंबर शिंदे, पोनि (गुन्हे) विश्वास डगळे, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे, अमोल दणके यांच्या पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.