पुणे (प्रतिनिधी)
जमीन विकसित करण्याचा करारनामा करूनही जमीन मालकाच्या नावे बोगस बँक खाते उघडून त्यामध्ये करोडो रुपयांचे व्यवहार केले व कराराप्रमाणे जमीन मालक शेतकऱ्याला पैसे न दिल्याने तीन बांधकाम व्यवसायिक, बँक संचालकासह एकूण सहा जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शेतकऱ्यांना जमीन विकसित करण्याची स्वप्ने दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे. डीएसके, मार्वल, नंतर व्हिपीटी कंपनीचाचा प्रकार समोर आल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कॅन्टोन्मेंट न्यायालयाने दिले होते.
भूषण पारलेशा, निलेश पालरेशा, विलास थनमल पारलेशा तिघे रा. व्हिटीपी हाऊस फिनेक्स मल जवळ, नगर रोड, संजय मुकुंद लेले संचालक खासगी सहकारी बँक, भवानी पेठ, नरेश दत्तू मित्तलू व्यवस्थापक, सहकारी बँक, रणवीत गिल रा. मुंबई असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
मुळ जमीन मालक शेतकरी राहुल तुपे रा. अन्सारी फाटा, मांजरी बुद्रुक, हडपसर यांनी यासंदर्भात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हीटीपी कंपनीचे भागीदार भूषण पारलेशा व त्यांचे भाऊ निलेश पारलेशा यांनी राहुल तुपे यांची जमीन पाहिली व ती विकसित करण्यासाठी त्यांच्यात 2014 साली करारनामा झाला. करारनामा नुसार तुपे यांच्या मिळकतीवर अर्बन बॅलन्स या नावाने प्रकल्प चालू करण्यात आला या प्रकल्पात एक अकरा मजली व दुसरी 12 मजली इमारत बांधण्याचे ठरले कराराप्रमाणे पालरेशा बंधू या दोन इमारती बांधणार होते.
इमारतीमध्ये ग्राहकांनी बुकिंग केलेल्या रकमेपैकी 41.18% हे राहुल तुपे यांना व 58.82% व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट या कंपनीला वाटून घेण्याचे होते त्याप्रमाणे जनता सहकारी बँक शाखा भवानी पेठ येथे खाते खोलण्यात आले. व्हीटीपी अर्बन प्रोजेक्ट पुणे एलएलपी अर्बन बॅलन्स नावाने कलेक्शन अकाउंट दोघांच्या संमतीने काढले होते, या खात्यावर दोघांच्या सह्या होत्या व करारानुसार खात्यावर टक्केवारीनुसार रक्कम जमा होत होती, डेव्हलपमेंट एग्रीमेंट मध्ये असणाऱ्या वीस अटी व शर्ती या दोघांना बंधनकारक असताना व्हीटीपी कंपनीच्या पालरेशा बंधूंनी काही दिवस ठरल्याप्रमाणे रक्कम तुपे यांच्या खात्यावर जमा केली, दरम्यान जुलै 2016 मध्ये जनता सहकारी बँक शाखेतील राहुल तुपे यांचे खाते तपासले असता त्यांच्या लक्षात आले की रकमा दुसऱ्याच खात्यावरती जमा होत आहे, एका सहकारी बँकेचे संचालक संजय मुकुंद लेले, मॅनेजर नरेश दत्तू मित्तल व व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे भागीदार भूषण पालरेशा, निलेश पालरेशा विलास थर्मल पालरेशा यांनी आपापसात संगनमत करून चेक बुक देण्याची सुविधा नसताना चेक बुक दिले ग्राहकांचे पैसे बँकेचे संचालक आणि व्यवस्थापकाच्या मदतीने काढून घेऊन जमीन मालक राहुल तुपे यांची फसवणूक केली.
व्हीटीपी अर्बन प्रोजेक्टचे तिघा भागीदारांनी फ्लॅट धारकाकडून कोट्यावधी रक्कम जमा केले व करारानुसार तुपे यांच्या हिश्याचे पैसे त्यांना वर्ग केले नाहीत, फसवणूक झाल्याचे सर्व खातरजमा करून राहुल तुपे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली, दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामध्ये बँकेचे संचालक व शाखा व्यवस्थापक यांचाही समावेश आहे.
पुढील तपास हडपसरचे पोलीस करत आहेत.
यासंदर्भात न्यायालयात जेष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी केस दाखल केली होती, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 403, 406, 409, 417, 420, 465, 467, 468, 471, 474, 477-A, 506, 120-B, 34 या कलमांचा समावेश आहे.