पुणे

“खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा अभिनव उपक्रम – विद्यार्थ्यांसाठी नीट आणि सीईटीच्या मोफत टेस्ट सिरीजचे आयोजन”

पुणे – नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भावी पिढीचे भविष्य घडविण्याच्या हेतूने आचार्य अॅकॅडमीच्या सहकार्याने शिरूरचे लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर आणि इंजिनिअर बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET आणि CET च्या ५-५ मोफत टेस्ट सिरीजचे आयोजन करुन एक अभिनव उपक्रम राबविला आहे.

रस्ते, पाणी आदी विकासकामे केली तर त्यात विशेष असे काही नाही, तर ती आपली जबाबदारी आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून आपण वेगळं काय करतो हे महत्त्वाचे आहे, असं सतत मांडणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघातील विद्यार्थी आणि अमोल ते अनमोल युट्युब चॅनलच्या सबस्क्राईबर यंदा NEET आणि CET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आचार्य अॅकॅडमीच्या सहकार्याने प्रत्येकी ५ मोफत टेस्ट सिरीजचे आयोजन केले आहे.

 

वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET आणि CET या दोन्ही परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि नामवंत क्लासेसमध्ये प्रवेश घेऊ न शकलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या टेस्ट सिरीज नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.

या संदर्भात आवाहन करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, NEET आणि CET या दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील व अमोल ते अनमोल युट्युब चॅनलच्या सबस्क्राईबर्स विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या करिअरला एक उत्तम दिशा देण्यासाठी या सुवर्णसंधीचा उपयोग करून घ्यावा. या मोफत टेस्ट सिरीजमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी https:/www.parikshagruh.com या संकेतस्थळावर आणि अधिक माहितीसाठी ९२७१३७५०२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

आचार्य अॅकॅडमीच्या सहकार्याने करिअर घडवण्यासाठी ही उत्तम संधी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं सांगून खासदार डॉ. कोल्हे यांनी आवाहन केले की, मित्रांनो, चला त्वरा करा आणि या मोफत टेस्ट सिरीजमध्ये सहभागी व्हा! यश तुमचंच आहे, या यशासाठी माझ्याकडून या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा!