पुणे:प्रतिनिधी:( रमेश निकाळजे )
पुणे शहरात गेल्या महिन्यात पीएमपीएमएल ठेकेदारांनी अचानक संप पुकारला होता, यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ झाली होती, पण आता पीएमपीएमएल प्रशासनाने ठेकेदारांना मोठा दणका दिला आहे, संप करणाऱ्या ठेकेदारांना दंड ठोठावण्यात येणार आहे.
भाड्याची रक्कम थकल्याने गेल्या महिन्यात पीएमपीएलच्या ठेकेदारांनी संप पुकारात सेवेत असलेल्या इ बसेस अचानक बंद केल्या होत्या यामुळे पीएमपीएल लाही मोठा आर्थिक फटका बसला होता, यामुळे पीएमपीएलच प्रशासनाने शहरातील सहा ठेकेदारांना २ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, पीएमपीएल प्रशासनांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
त्याच संपामुळे पीएमपीएमएला आर्थिक फटका बसला, आता ठेकेदारांच्या बिलातून ही दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे असे पीएमपीएमएल असे सांगण्यात आले आहे, सहा ठेकेदारांवर पीएमपीएल प्रशासनाकडून कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या महिन्यात पीएमपीएमएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप पुकारला, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती, या संपाचा विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सात ते आठ लाख प्रवाशांना फटका बसला होता, ठेकेदारांनी ‘पीएमपीएमएल’च्या ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी व हंसा या चार ठेकेदारांचे चार महिन्यांचे ९९ कोटी रुपयांची बिले थकल्याने त्यांनी अचानक संप सुरु केला, संपात ९०७ बसेसची सेवा अचानक ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात ‘पीएमपीएमएल’ची सेवा विस्कळीत झाली होती.
त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीएमपीएमएल प्रशासनाला ९० कोटी रुपये दिले, त्यापैकी ६६ कोटींची थकीत रक्कम या चार ठेकेदारांना आणि २४ कोटी रुपये हे ‘एमएनजीएल’चे देण्यात आले, त्यानंतर दिड दिवसांच्या या संपानंतर ठेकेदारांनी संप मागे घेतला आणि बससेवा पुन्हा सुरुळीत सुरु करण्यात आली.