पुणे

“भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “-

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
 भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानोपासक होते “ज्ञान ही शक्ती” आहे. यावर त्यांचा विश्वास होता यासाठी त्यांनी समाजाला शिका व संघटित व्हा … वाचाल तर वाचाल…असा संदेश दिला. तरी आजची तरुण पिढी ही बाबासाहेबांच्या कार्याबद्दल अनभिद्य दिसून येते म्हणून तरुण वर्गाला या थोर समासुधारकांचे समाजासाठी केलेले त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या जयंती निमित्त आज या ठिकाणी 25000 पुस्तकांचा वाटप करीत आहोत “असे उदगार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

 

“भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समतेची दिशा दिली. डॉ. बाबासाहब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते ते संबंध राष्ट्राचे नेते होते, ते युगकर्ते होते त्यांनी निर्माण केलेले युग हे सामान्य माणसाला लोकशाहीच्या क्षितिजावर उभे करणारे युग होते. असे प्रतिपादन मोहन जोशी यांनी केले.

 

यावेळी अनेक थोर समाज सुधारक ज्यांनी महाराष्ट्र राज्याला दिशा देणारे धोरण दिले यांच्या जीवनावरील २५ हजार पुस्तकाचे वाटप आमदार रवींद्र धंगेकर व मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. महापौर कमल व्यवहारे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, लता राजगुरू, मा नगरसेविका सुशिला ताई नेटके, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब अमराळे,काँग्रेस ओ.बी.सी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे,स वाल्मिकी जगताप, प्रियांका रणपिसे,चेतन आगरवाल, डॉ अनुपकुमार बेगी, चंद्रकांत चव्हाण,अस्लम बागवान, वाहिद बियाबनी, अविनाश अडसूळ, गेहलोत ताई, गोरख पळसकर, शिवानी माने, नरेश नलवडे , रुपेश पवार , राजेंद्र खेडेकर, किरण जगताप, अमित देवरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मा गणेश नवथरे यांनी केले.