मुख्यमंत्री केसरी २०२३ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून महाराष्ट्राची ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या परंपरेला जपण्याचे काम नगरसेवक नाना भानगिरे यांनी केले आहे असे मत पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी वाडकर मळा,हडपसर येथे बोलताना काढले,पुण्यात प्रथमच मुख्यमंत्री केसरी 2023 बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी बक्षीस वितरण समारंभात पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे बोलत होते.
यावेळी माजी खासदार शिवसेना उपनेता शिवाजीराव आढळराव पाटील,युवा सेना संपर्कप्रमुख किरण साळी,शहर सहसंपर्क प्रमुख अजय भोसले,जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे,जिल्हाप्रमुख उल्हास तुपे,भागवत बाणखेले,नगरसेवक सम्राट थोरात,उद्योगपती बाळासाहेब भानगिरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे,उपशहरप्रमुख सुनील जाधव,संजय डोंगरे,शन्कर कांबळे,सोपान लोंढे,गोरखतात्या घुले,संदीप धाडसी मोडक,मकरंद केदारी,विपुल बहुले,अक्षय तारू,विकास शेवाळे,गोरख पांचाळ,योगेश सातव,बबन आंधळे,भाजप नेते बाळासाहेब घुले,योगेश सूर्यवंशी,प्रसिद्ध बैलगाडामालक शैलेश आल्हाट,बाबू गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी,बैलगाडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शर्यतीत महाराष्ट्रातील विविध बैलगाडा शर्यती गाजवणारे बकासुर,सुंदर,बलमा,रायफल,सरदार आदी नामांकित बैल सामील झाले होते.
प्रथम क्रमांक जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड यांचा बैलगाडा,द्वितीय क्रमांक निसर्ग गार्डन कात्रज,तृतीय क्रमांक नाथ साहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ यांनी तर चतुर्थ क्रमांक पीर साहेब प्रसन्न सुभाष दादा मोडक,पाचवा क्रमांक श्री कन्या प्रमोद शेठ घुले पाटील,सहावा क्रमांक जीवन भानगिरे,सातवा क्रमांक काळ भैरवनाथ प्रसंन्न उरुळी देवाची यांनी पटकावला. विजेत्या संघाना ट्रॅक्टर,बुलेट,दुचाकी आदी बक्षिस मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी उद्योगपती बाळासाहेब भानगिरे आणि नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन भानगिरे, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, सचिन भानगिरे, आकाश भानगिरे, अजय भानगिरे, सिद्धांत भानगिरे, सचिन तरवडे, अभिदादा भानगिरे आणि नाना भानगिरे आयोजक टीमचे सदस्य अमित दाभाडे, विनायक पाटील, अभिजित बाबर, राजू गवळी, अमोल जगताप, प्रकाश कलगुटकर यांनी परिश्रम घेतले.