पुणे

आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल प्रशिक्षक म्हणून पती व पत्नीची निवड

फुरसुंगी  –  ढाका बांगलादेश येथे 13 मे ते 17 मे 2023 या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय ज्युनिअर युथ वुमेन हँडबॉल स्पर्धा होणार आहे. इंडियन युथ वुमन हॅण्डबॉल संघासाठी उषा रुपेश मोरे व रुपेश उत्तम मोरे यांची आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

उषा रुपेश मोरे या इ . 7 वी पासून हॅण्डबॉल हा खेळ खेळत आहेत. भेकराईनगर ढमाळवाडी या छोट्याशा गावातून श्री भेकराई माता माध्यमिक विद्यालय या शाळेतून खेळाची सुरुवात त्यांनी केली. 17 नॅशनल खेळले आहेत . गेली पंधरा वर्षाहून अधिक त्या हॅण्डबॉल प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत 12 तारीखेला संघ रवाना होणार आहे.

रूपेश मोरे यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत 7 खेळाडूंना शिवछञपती पुरस्कार मिळाले आहेत .तर अनेक खेळाडू नॅशनल घडवले आहेत . महाराष्ट्र राज्यावर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम करतात. स्वतः शिवछञपती पुरस्कार विजेते आहेत. उषा मोरे या रोज खेळाडूंचा सराव घेतात. अनेक खेळाडू नॅशनल घडलवे आहेत. महाराष्ट्राला व विद्यापिठाला त्यांनी मेडल मिळवून दिले आहे.