पुणे, ः हातचलाखीने सोन्याची चोरी, नैसर्गिक मृत्यूचा बनाव उघड, हातभट्टी दारूचा मोठा साठा वाहनासह जप्त आणि गंभीर गुन्ह्यातील अशा चार गुन्ह्यातील आरोपींच्या हडपसर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी सांगितले की, भेकराईनगरमधील लक्ष्मी ज्वेलर्समधून सोनं चोरी करणाऱ्या सविता मनोज चव्हाण (वय ४७, रा. शिवरामदादा तालमीजवळ, गणेश पेठ, पुणे), वर्षा योगेश चव्हाण (रा. शनी मंदिराशेजारी चव्हाणनगर, पुणे), स्नेहा शैलेंद्र पवार (वय २३, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, पुणे) आणि विधिसंघर्षित एका मुलीला ताब्यात घेतले. दुसऱ्या गुन्ह्यातील ओंकार रवी क्षीरसागर (वय २७), तिसऱ्या गुन्ह्यातील आशिष मारुती धणके (वय २४, रा. हरपळवस्ती, फुरसुंगी, पुणे) आणि चौथ्या गुन्ह्यातील भीमा मारुती गायकवाड (वय ३३), विकास संभाजी लिंगायत (वय २३, दोघे रा. रासगेआळी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, स ंदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, अजित मदने, रशिद शेख, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.