लोणी काळभोर (पुणे) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळी समोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना लोणी काळभोर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 16) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच, महिलांनाही शिवीगाळ करण्यात आली आहे.
शिवीगाळ व मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांच्या विरोधात लोणी काळभोर नागरीकांमध्ये मोठा रोष पसरला आहे. मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भोसले परिवार व नागरीकांमध्ये होत आहे.पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे हे त्या मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव असून, वैभव मोर यांच्या समवेत असलेल्या पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मारहाण करण्याबरोबरच महिलांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप भोसले चालीतील नागरीकांनी केला आहे. या मारहाणीच्या व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या असून, पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या सहकारी पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलीआहे.
लोणी काळभोर -घरासमोर शांततेत वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना,नागरीकांना पोलिसांची बेदम मारहाण केली.लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीमधील स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष भोसले यांचा वाढदिवस असल्याने, चाळीतील कांही नागरीक घरासमोरील रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापत होते. या कार्यक्रमासाठी कांही अल्पवयीन मुले व महिलाही हजर होत्या. त्याचवेळी पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांचे चार सहकारी पोलिसांच्या वाहनातून घटनास्थळी आले. पोलिसांनी गाडीतून उतरताच केक कापणाऱ्या नागरीकांना व अल्पवयीन मुलांना समज देण्याऐवजी हातातील काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी मुलांना मारहाण करु नये, यासाठी कांही महिलांनी पोलिसाना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना शिवीगाळ करण्याबरोबरच दिसेल त्याला बेदम मारहाण करण्यास
सुरुवात केली.
दरम्यान, पोलिस मारहाण करत असल्याचे पाहुन संतोष भोसले व त्यांच्या घरातील नातेवाईकांनी पोलिसांना वरील
प्रकार थांबवण्याची विनंती केली. मात्र वैभव मोरे यांनी भोसले कुटुबियांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार तबल दहा ते पंधरा मिनिटे चालु होता. हा प्रकार मोबाईलमध्ये शूट होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी घडत असलेली घटना शूट करणाऱ्यांचे मोबाईल जप्त करून, मोबाईलमधील व्हिडोओ डिलीट करून टाकले.अल्पवयीन मुलांना व नागरीकांना होत असलेली मारहाण वाढत चालल्याने, स्थानिक नागरीकानी मध्यस्थी करुन मारहाण थांबवली. तसेच पोलिसांच्या विरोधात नागरीक पोलिस ठाण्यात पोचले. नागरीकात पोलिसांच्या विरोधात असलेला राग पाहुन, संतोष भोसले यांनी वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत लेखी अर्ज दिला आहे.