पुणे

पीडीसीसीच्या फुरसुंगी शाखेने दोन हजारांची नोट नाकारली – राजाभाऊ होले

फुरसुंगी ः दोन हजार रुपयांची नोट हि चलनात असुन ते अजुनहि कायदेशीर चलन आहे सर्व बँकांमध्ये बिनदिक्कत त्या बाबतीत व्यवहार होत असुन, मात्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फुरसुंगी शाखेत, मुळ शाखेतच जाऊन भरणा करावा,असे मुख्य कार्यकारी अधिकार्याचे परिपत्रक दाखवुन सर्वसामान्यांना वेठिस धरत आहे.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर ने २००० !रु.ची नोट हे अजुनही पुढील आदेश येईपर्यंत कायदेशीर चलन राहील हे जाहिर करुनही, अशा प्रकारचे परिपत्रक काढुन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवाबदार मुख्य कार्यकारी अधिकारी कडुन राष्ट्रीय कायदेशीर चलनाचा अवमान केला गेला आहे. असे फुरसुंगीतील नागरिक राजाभाऊ होले यांनी सांगितले.
दोन हजार रुपयांची नोट नाकारुन पीडीसीसी बँक सर्नावसामान्य गरिकांना वेठीस का धरत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.