पुणे

पालखी मार्गाच्या कामात दुर्लक्ष का…? प्रशासनाला स्थानिक नागरिकांचा सवाल

भेकराईनगर : राष्ट्रीय पालखी महामार्ग ९६५, पुणे-सासवड रोड, भेकराईनगर ते वडकी येथे रोडच्या कडेला खूप मोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाकडून दोन दिवसांपासून पासून खड्डे बुजवून लेवल करण्यास सुरवात केली असली तरी वापरण्यात येणारा मुरम निकृष्ट दर्जाचा असून माती मिसरीत आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे.
पालखीमार्गाला लाली पावडर लावायचे काम चालू आहे का …?
तात्पुरत्या स्वरूपात काम चालू असून याच मार्गावरून लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय मोठ्या भक्तिभावाने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जात असतात.

पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम उत्कृष्ठ दर्जाचे करावे तसेच खराब रोडला डांबरीकरण करावे, सत्यमपुरम ते दिवेघाट रोडचे रुंदीकरणाचे काम लवकर चालू करावे ,नियमीत वाहतूकोंडी होत असते, स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
तरी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे.

आणि पालखी सोहळा या मार्गावरून चांगल्याप्रकारे आनंदी आणि भक्तीमय वातावरणात मार्गस्थ व्हावा ही रमेश निवंगुणे, राजाभाऊ सुर्यवंशी, सतिश जगताप , बाळासाहेब लोळे, उमेश पवार, दिपक भोसले, अशोक कामठे,अभिलाष शिंदे या स्थानिक नागरिकांची मागणी आहे.