पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
दिनांक 23/05/2023 रोजी बांधकाम व्यवसायीक यांनी त्यांचा कामगार याने त्याला ऑफिसला पोहचवणेकामी दिलेले तेवीस लाख रुपये घेवुन पळुन गेलेबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भा.द.वि.क.381 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. परंतु सदरचा कामगार हा त्याच रात्री फिर्यादी यांचेकडे परत आला व त्याने फिर्यादी व विश्रामबाग पोलीसांना तो पळुन गेला नव्हता, तर त्याला दत्तवाडी पोलीस ठाणे हद्दीतील निलायम पुला शेजारी चार अज्ञात चोरटयांनी त्याचे दुचाकीला स्वीफ्ट गाडी आडवी घालुन त्यांचे अपहरण करुन, त्यास मारहाण करुन, त्याचेकडील पैसे चोरुन नेलेबाबत सांगितले.
त्यानुसार कामगार याचे मालकांनी त्याचेसह तातडीने दत्तवाडी पोलीस ठाणेस येवुन कळविल्यानंतर दत्तवाडी पोलीसांनी ताबडतोब कामगार याचे सांगणेनुसार त्याचे मालकाचे सुमारे तेवीस लाख रुपये अज्ञात चार चोरटयांनी त्यांचे अपहरण करुन, त्यास मारहाण करुन चोरुन नेलेबाबत दत्तवाडी पोलीस ठाणे येथे भा.द.वि कलम 392, 363, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दाखल दोन्ही गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन दत्तवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरीक्षक, गुन्हे विजय खोमणे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दत्तवाडी तपास पथकाची पाच पथके तयार करुन, फिर्यादी राहत असलेल्या लॉ कॉलेज रोडपासुन विश्रामबाग हद्दीतील पेपर गल्ली ते दत्तवाडी पोलीस ठाणे निलायम पुल, स्वारगेट पासुन कोथरुड भुगाव परीसरातील तांत्रिक विश्लेषण करून आरोपी कामगार याचेकडे सलग तपास पथकातील कर्मचायांनी वेग-वेगळया पध्दतीने चौकशी केली असता त्याच्या सांगण्या मध्ये विसंगती अढळुन आली.
त्याचेकडे अधिक कौशल्यपुर्वक चौकशी करता त्याने त्यांचेवरील झालेले कर्ज फेडण्यासाठी मालकांचे पैसे पळवुन नेले व पोलीसांना व मालकाला गुंगारा देण्यासाठी दत्तवाडी पोलीस ठाणे येथे खोटी फिर्यादी दिल्याचे कबुल केले. तसेच त्याने सदर अपराधाची पुर्व तयारी बरेच दिवसांपुर्वी पासुन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. आरोपी कामगार, वय-36 वर्षे, रा.सोलापुर यास ताबडतोब ताब्यात घेवुन, त्याने डेक्कन येथील एका हॉस्पीटलच्या आवारात पार्क करुन ठेवलेल्या त्याच्या ऍक्टिव्हा गाडीतुन पळवुन नेलेले तेविस लाख रुपये गाडीसह जप्त करण्यात आले आहेत. तसेच दत्तवाडी पोलीस ठाणे येथील फिर्याद खोटी असल्याने त्यास विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच गुन्हयांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक,गुन्हे विजय खोमणे, दत्तवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री.प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त्त, परिमंडळ-3,पुणे, श्री.आर.राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री.राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक,(गुन्हे), श्री.विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अमंलदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, काशिनाथ कोळेकर, प्रमोद भोसले, अनुप पंडीत, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला, नवनाथ भोसले, अमोल दबडे, दयानंद तेलंगे पाटील, सद्दाम शेख, अमित चिव्हे, ज्ञानेश्वर शिंदे, किशोर वळे यांनी केली आहे.