पुणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी अर्ज केला का?

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार दोन महिलांचा गौरव करण्यात येणार आहे यासाठी 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन महिला प्रतिनिधींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे,या करीता महिलांना ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे.

निकष काय?
महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला यासाठी पात्र ठरतील महिला व बाल विकास क्षेत्रात किमान तीन वर्ष काम केलेले असणे गरजेचे आहे महिलांच्या समस्या आणि प्रश्नाबाबत संवेदनशीलता असावी.

पुरस्काराचे स्वरूप काय?
ग्रामपंचायत मध्ये संबंधित महिलांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह श्रीफळ रोग पाचशे रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

निवड समितीत कोण कोण असणार?
संबंधित ग्रामपंचायत सरपंच अध्यक्ष, ग्रामसेवक ,पोलीस पाटील ,प्राथमिक शाळा मुख्याध्यापक ,अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे.

अर्ज कोठे कधीपर्यंत करायचा?
पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार महिलांनी ग्रामपंचायत कडे अर्ज करावेत.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचनांचे पत्र ग्रामपंचायत स्तरा वर 31 मे पूर्वी या सर्व उपाययोजना करून बक्षीस वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भूषण जोशी
(गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली ,जिल्हा. पुणे)