पुणेमहाराष्ट्र

“महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त.., “पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…””गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!””महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार.., पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने”

पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करत महाविकास आघाडी सरकारमधील ४० आमदार पळून गेल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. पुढे या चाळीस आमदारांनी महाराष्ट्राशी गद्दारी करत दिल्लीश्वरासोबत हात मिळवणी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यांच्या या गद्दारीची सर्वांना माहिती व्हावी, या हेतूने आजचा दिवस “गद्दार दिवस” म्हणून पाळण्यात आला तसेच या गद्दारांच्या गद्दारीची खरी ओळख जनतेसमोर यावी यासाठी “50 खोके एकदम ओके” हे आंदोलन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे घेण्यात आले.

 

या आंदोलन प्रसंगी “आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी”..,
“चले जाव-चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव..!”
“महाराष्ट्र त्रस्त… खोके घेऊन गद्दार मस्त.., “पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके…””गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!””महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार.., “
“खोके सरकारचा चालणार नाही थाट गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट…”
“पन्नास खोके, गद्दार ‘Not’ ओके…”
“खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय… “
अशा विविध घोषणांनी जंगली महाराज रस्त्याचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,” नेहमी आपण कुठलाही दिवस साजरा करत असताना आपल्या राष्ट्राला किंवा आपल्या राज्याला अभिमानास्पद अशा गोष्टी ंचा उत्सव साजरा करतो.आजचा दिवस मात्र गद्दार दिवस म्हणून सगळीकडे कूप्रसिद्ध झाला याला कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसोबत गद्दारी करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस गद्दार आमदारांनी सरकार पाडले होते.महाविकास आघाडी सरकारला पायउतार करत हे गद्दार भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाले. संपूर्ण देशाला महागाई बेरोजगारीने वेठीस धरणाऱ्या भारतीय जनता पार्टी सोबत जाऊन यांनी सत्ता स्थापन केली.आजही राज्यातल्या लहान लहान मुलांना सुद्धा “पन्नास खो… म्हणून विचारले तर ते एकदम ओके…..” असं उत्तर देतात.

या गद्दारांना यांच्या कामाचा ठसा उठवता तर आला नाही पण त्यांच्या गद्दारीची चर्चा मात्र गेली वर्षभर अव्यातपणे सुरूच राहिली.महाराष्ट्रात गद्दारी करून सरकार स्थापन केल्यानंतर हे गद्दार कुठेतरी राज्याच्या हितावह काम करतील अशा अपेक्षा असताना यांनी मात्र फक्त दिल्लीवाऱ्या केल्या राज्यात येणारे उद्योग गुजरातला नेले, राज्यात येणारा रोजगार गुजरातला नेला. कुठल्याही प्रकारचा मोठा उद्योग राज्यात आणता आला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हे सरकार गेल्या वर्षभरात सपशेल अपयशी ठरले.चर्चा होत राहिली फक्त खोक्यांची. येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये या गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेने सज्ज व्हावे” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी यानिमित्ताने केले.
आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप गायकवाड,बाळासाहेब बोडके, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, राकेश कामठे, सुषमा सातपुते , महेश हांडे, उदय महाले, राजू साने, अर्चना कांबले आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.