साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या टेरेसवर १००.१ केडब्ल्यू क्षमतेची सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे. सेंटर फॉर इनव्हारेंनमेंटल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन (CERE) या धर्मदाय संस्थेमार्फत साने गुरुजी आरोग्य केंद्राच्या टेरेसवर १००.१ केडब्ल्यू क्षमतेची सोलर सिस्टीम्स बसविण्यात आली. या सिस्टीम्ससाठी एकूण खर्च अंदाजे रु. १ कोटी इतका आलेला आहे. हा खर्च इंडसइंड बँक यांच्या सीएसआर फंडातून करण्यात आला आहे. सोलर सिस्टीम्समुळे हॉस्पिटलच्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल. सोलर सिस्टीम्सचे उद् घाटन एम एस मातिला लोबो, सीएसआर प्रमुख इंडसइंड बैंक व डॉ. रशनेह परडिवाला फाउंडर डायरेक्टर (CERE) यांच्या हस्ते करण्यात आले. सोलर सिस्टीम्सचा प्रकल्प साने गुरुजी आरोग्य केंद्रामध्ये सुरु करण्याबाबत व प्रकल्पाबाबत माहिती डॉ. प्रणिता जोशी-देशमुख, प्राचार्या, सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय यांनी दिली.
या सोलर सिस्टीम्स प्रकल्पाबद्दल माहिती पॉवरपॉईंटच्या माध्यमातून CERE च्या श्रीमती. शबनम यांनी दिली. साधारणपणे दर महिन्याला दीड लाखाच्या जवळपास बीज बिलामध्ये कपात होईल. या उद् घाटनटनप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सतीश अग्रवाल, सचिव, श्री. अनिल गुजर व सहसचिव, श्री. अरुण गुजर, प्राचार्या, डॉ. प्रणिता जोशी-देशमुख, म. आ. मंडळाचे विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सामाजिक कार्याची चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.
सेंटर फॉर इनव्हारेंनमेंटल रिसर्च अॅण्ड एज्युकेशनच्यावतीने साने गुरुजी आरोग्य केंद्र या रुग्णालयातील हा स्वास्थ सेवेतील नवीन उपक्रम आहे. यापूर्वी केवळ शाळांना ही मदत दिली जात असे.