पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
दिनांक २३/०६/२०२३ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस हवालदार सचिन कुटे, पोलीस शिपाई गणेश हांडगर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक अनोळखी इसम, लालमाती ग्राऊंड, जुना मुंढवा रोड, वडगावशेरी पुणे येथे येणार असल्या बाबतची बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री अरविंद कुमरे, पोलीस हवालदार २१६७ कुटे, पोना ७३२९ धांडे, पोलीस अंमलदार ८५६३ हांडगर, पोलीस अंमलदार ३९३३ जाधव, पोलीस अंमलदार ४३५२ कोद्रे, पोलीस अंमलदार १०१९६ गडदरे, पोलीस अंमलदार ९९६७ शिंदे, पोलीस अंमलदार ८३६१ कदम असे बातमीचे ठिकाणी जावून, तेथे सापळा रचुन इसम नामे रमेश कमलेश साकिया, वय २५ वर्षे, रा- एन. आय. बसस्टॉप जवळ, दिनकर पठारे वस्ती, लेन नं.०७, चंदननगर पुणे, मुळ रा-वॉर्ड नं.१५, पावर हाऊस जवळ, ग्राम- लहार, तहसील- लहार, जि-भिंड, राज्य मध्यप्रदेश यास पकडुन त्याचेकडुन १०,०००/- किं. रु. एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा माल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी ही मा. शशीकांत बोराटे, पोलीस उपआयुक्त सो परीमंडळ-४ पुणे शहर, मा. संजय पाटील, सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, राजेंद्र लांडगे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सो, चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी अरिवद कुमरे, पोउपनिरी दिलीप पालवे, पोलीस हवालदार २१६७ कुटे, पोलीस हवालदार १९५१ संकपाळ, पोना महेश नाणेकर, पोना श्रीकांत शेंडे, पोना शिवाजी धांडे, पोलीस अंमलदार गणेश हांडगर, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, विकास कदम यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास अरविंद कुमरे, पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत.
( राजेंद्र लांडगे )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर