पुणेहडपसर

अण्णासाहेब मगर यांनी केली पुणे जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी : उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

अण्णासाहेब मगर यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करत पुणे जिल्ह्याच्या विकासाची पायाभरणी केली. त्यांनी दूरदृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्यांना पुणे जिल्हयाचे शिल्पकार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.” असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप यांनी केले.

 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथिनिमित्त अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जगताप यांनी गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी प्रा. डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, कैलास म्हस्के, शिवाजी सोनवणे, ललित सिंग, देविदास पवार तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. नाना झगडे यांनी मानले.

फोटो: अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, प्रा. डॉ. नाना झगडे व इतर मान्यवर