पुणे / हडपसर (सतीश भिसे )
शेवाळेवाडी फाट्यावरील एका मिठाईच्या दुकानात साहित्याची पावणे सातच्या सुमारास तिघांनी कुऱ्हाडीने तोडफोड केली त्यानंतर मोटरसायकलवर पळून जाणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पाठलाग केला सहा किलोमीटर अंतरावर आरोपींची मोटर सायकल घसरून ते खाली पडले त्यातील एका अल्पवयीन मुलाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जण फरार झाले आहेत.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास तिघांनी किरकोळ कारणावरून शेवाळवाडी फाट्यावरील चैतन्य स्वीट अँड सेंटरमध्ये घुसून दुकानातील काचेची कपाटे व फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड केली रात्रपाळीवर असलेले पोलीस विजयकुमार ढाकणे हे शेवाळवाडी चौकात आले असताना ही घटना घडत होती त्यांनी फोनवरून ही घटना पोलीस ठाण्याला कळवली त्यानंतर त्यांनी मोटरसायकलवर पळून जाणाऱ्यांचा पाठलाग केला सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आरोपींची मोटरसायकल घसरून ते खाली पडले व ते उसाच्या शेतात पळून गेले पाठीमागून ढाकणे यांच्या मदतीला एक पोलीस पथक पोहोचले व त्यांनी उसात लपलेला एका 17 वर्षीय विधीसंघर्ष मुलाला गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी गाडीसह ताब्यात घेतले दुसरा आरोपी गौरव संतोष अडसूळ वय 19( राहणार कॉलनी नंबर 5 शेवाळवाडी व एक अल्पवयीन मुलगा पळून गेला असून हडपसर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
शेवाळवाडी येथे काही जणांकडून तोडफोड करण्यात आली, हडपसर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ प्रतिसादामुळे एक आरोपी सापडला तर पोलिसांच्या तत्परतेने परिसरातील तणाव निवळण्यास मदत झाली, मांजरी आणि शेवाळवाडी या दोन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व्यापारी यांनी उस्फुर्तपणे पोलीस स्टेशन येथे येऊन पोलीस हवालदार विजय ढाकणे यांचा सत्कार केला आणि पोलीस स्टेशनच्या सतर्क कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले.
अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे वाढतेय प्रमाण…..
हडपसर परिसरात अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत चालल्याने वाद मारामाऱ्या व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे, हडपसर पोलिसांनी महाविद्यालय व शाळांमध्ये व्यसनाबाबत जनजागृती अभियान राबवले आहे, हडपसर परिसरात व्यसनाची अनेक साधने विक्री केली जात असून पोलिसांनी या पुरवठादार अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे शेवाळवाडी येथे घडलेल्या तोडफोडीच्या घटनेत तणाव निर्माण झाल्याने नागरिकांनी शॉप बंद ठेवली होती हडपसरचे पोलीस तातडीने दाखल पुढील अनर्थ टाळला व एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले.