पुणेमहाराष्ट्र

जेजुरी नगरपरिषद शहर फेरीवाला समितीची निवडणूक देशात प्रथम बिनविरोध…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे.

महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरी येथे शहर फेरीवाला समिती सदस्य पदासाठी “जाणीवचा भंडारा” उधळत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून पथविक्रेत्यांनी आनंद व्यक्त केला.
शहर फेरीवाला समिती सदस्यांच्या आठ जागेसाठी घेण्यात आलेल्या जागेसाठी आठच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी पुणे श्रीकांत ह.चोभे यांनी जाहीर केले.
या वेळी जेजुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, प्रकल्प अधिकारी बाळासाहेब बगाडे, अमर रणवरे, जाणीव हाॅकर्स संघटणा राज्य कार्यवाहक संजय शंके यांनी उपस्थित नवनिर्वाचित सदस्य आणि पथ विक्रेता यांना अधिनियम व इतर विषयावर मार्गदर्शन केले.

बिनविरोध आलेले प्रतिनिधी

१) जयश्री संदिप रोमन (खुला प्रवर्ग महिला)

२) बाळासाहेब माळवदकर ( खुला प्रवर्ग पुरूष)

३) शांताराम खोमणे ( खुला प्रवर्ग पुरूष)

४) दत्तात्रय विलास हरिचंद्रे(इ. मागासवर्गीय प्रवर्ग)

५) गौरी हरिदास लांघी (अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग)

६) संगीता उत्तम चांदेकर (अनुसूचित जाती महिला प्रवर्ग)

७) सुनंदा घोरपडे (अपंग महिला प्रवर्ग)

८) लतिफा मणेर (अल्पसंख्याक महिला प्रवर्ग)

या पथ विक्रेत्यांची प्रतिनिधी म्हणून शहर फेरीवाला समितीवर बिनविरोध निवड झाली.
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी नगरपरिषद भवनात जाणीव हॉकर्स संघटणा राज्य कार्यवाहक संजय शंके, जाणीव हाॅकर्स संघटणा पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश प्रकाश भुजबळ, दिलासा जनविकास संस्था जेजुरी शहर अध्यक्षा स्वाती महादेव माळवदकर, पुणे शहर महिला अध्यक्षा श्वेता ओतारी, दिलासा जनविकास संस्था संस्थापिका कल्पना शंके, दिलासा जनविकास संस्था पुरंदर तालुका अध्यक्षा सिमा भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते हरिदास रत्नपारखी, सचिन उपाध्ये, विशाल भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब बगाडे यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार मानले.

जाणीव दिलासाचे काम देशाला दिशा देणारं!

शहर फेरीवाला समिती देशातील पहिली जेजुरी नगरपरिषद म्हणून जगात आपली ओळख निर्माण करणारी नगरपरिषद असल्याचे शंके यांनी जाहिर केले. संस्था, संघटणा ह्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या जीवावर मोठ्या होत असतात. कार्यकर्ते जेव्हा समाजातील वंचित घटकासाठी निस्वार्थ पणे तन, मन, धनाने काम करतो तेव्हा कुठे जेजुरी नगरपरिषद सारखे काम होत असते.

 

यांचे उत्तम उदाहरण म्हणून दिलासा जनविकास संस्था आणि जाणीव हॉकर्स संघटनाचे कार्यकर्ते गेली 29 वर्षांपासून छोट्या विक्रेत्यासाठी कार्य करित आहे. या मध्ये जेजुरी जाणीव हाॅकर्स संघटना अध्यक्ष निलेश भुजबळ, जेजुरी दिलासा जनविकास संस्था अध्यक्षा स्वाती माळवदकर यांनी जेजुरी नगरपरिषद आणि विविध संस्था, संघटना, आणि शहरातील सुमारे बाराशे किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय ठेऊन कार्य करित आहे.त्यामुळे पुन्हा “जेजुरी नगरपालिकेवर जाणीवचं वर्चस्व” प्रस्थापित झाले असल्याचे आणि जेजुरी नगरपरिषदचा आर्दश महाराष्ट्रातील, देशातील महानगरपालिका घेतल्या शिवाय राहणार नाहीत. असे राज्य कार्यवाहक संजय शंके यांनी सांगितले.