पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली.
आजच्या या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले,यात प्रामुख्याने लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे.
या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत.
राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील.
या बैठकीला खासदार सौ.वंदनाताई चव्हाण,ज्येष्ठ नेते माजी आमदार श्री. जगन्नाथ बापू शेवाळे, श्री. जयदेवराव गायकवाड, सौ. कमलनानी ढोले पाटील, श्री.अंकुशआण्णा काकडे, माजी महापौर श्री.शांतीलाल सुरतवाला,श्री. प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे,
रवींद्रआण्णा माळवदकर, माजी उपमहापौर निलेश मगर,निलेश निकम,विरोधी पक्षनेत्या सौ.दिपालीताई धुमाळ, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.सुनील जगताप, मा.नगरसेवक सतीश म्हस्के,काकासाहेब चव्हाण,प्रदीप गायकवाड,बाळासाहेब धनकवडे,श्रीकांत पाटील, वनराज आंदेकर,संतोष फरांदे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे,युवती अध्यक्ष सुषमा सातपुते,महिला अध्यक्षा मृणालिनीताई वाणी , मा.जि.सदस्य सौ.अनिताताई इंगळे, यांच्यासह सर्व सेलचे शहराध्यक्ष , कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.