पुणेमहाराष्ट्र

तहसील कार्यालयात खासगी एजेंट चा सुळसुळाट, तहसील मध्ये चहा पेक्षा किटली गरम अशी अवस्था..!

पुणे :प्रतिनिधी : रमेश निकाळजे

हवेली तहसील कार्यालय खरे तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे की लोकांच्या समस्या वाढवण्यासाठी हेच समजत नाही. वास्तविक पाहता इथे लोकं आपल्या अडचणी सोडवण्यासाठी येत असतात.

परंतु खासगी एजेंट त्यांच्या अडचणी सोडवण्याऐवजी नागरिकांच्या अडचणीत जास्तच भर घालून नागरिकांना जास्तच अडचणीत आणत असल्यामुळे तहसील कार्यालयात नेमके काय चालले आहे असा प्रश्न पडला आहे. वास्तविक पाहता येथील संपूर्ण कारभार हा इथे कायमस्वरूपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात असायला पाहिजे, परंतु तसें होताना दिसत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांना इथे अधिकार आहेत की नाही असा प्रश्न पडतो. कारण सगळे व्यवहार हे खासगी एजेंटच पाहत आहेत.अगदी किरकोळ कामांसाठी हे एजेंट लोकं नागरिकांना वेठीस धरत असल्यामुळे रोज त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी येत असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? खरे तर या एजेंट लोकांना एवढे अधिकार कसे मिळतात की लोकांची ते अशा पद्धतीने पिळवणूक करून वेठीस धरत आहेत. त्यामुळे या खासगी एजेंट लोकांवर कारवाई होणार का? असा प्रश्न पडत आहे.