पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : हडपसर वरून लोहगावला जाण्यासाठी हडपसर च्या नागरिकांना २ बस बदलून जावे लागत होते, त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. अनेकवेळा तासनतास बस साठी उभे राहून ही हडपसर ला जाता येत नव्हते.
अशी तक्रार आम आदमी पार्टीच्या नागरिकांनी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते फुलचंद म्हस्के, अविनाश भाकरे, अर्जुन साकोरे यांच्याकडे तक्रार केली.त्या सर्वांनी यासाठी पी एम पी एम एल कडे पाठपुरावा करून लोहगाव येथील नागरिकांसाठी ही बससेवा सुरू केली. सुरू केली. यावेळी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री मुकुंद किर्दत यांच्या हस्ते बसचे उद्घाटन करण्यात आले. बसचे चालक व कंडक्टर यांचा सत्कार फॅबियन अण्णा सॅमसंन यांनी केले.
गणेश ढमाले, अमित म्हस्के, मनोज फुलावरे, तानाजी शेरखाने, अक्षय दावडीकर, सतीश यादव, संजय कोणे, गणेश मोरे, राजू परदेशी, साहील परदेशी, सीमा गुट्टे, तहसीन देसाई, प्रीती निकाळजे, संजय कटारनवरे, जोगिंदर पाल तुरा, बाळासाहेब चोखर, मिलिंद ओव्हाळ, चंद्रकांत गायकवाड, इमरान खान, दिलीप साळवे, अविनाश वैरागर, दिपक सिंग व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आप च्या सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.