हडपसर , ता. २० : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर यांच्यातर्फे गुरुवार पासून (ता. २०) रांगोळी स्पर्धेचे आयोजन अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रांगणात कनिष्ठ महाविद्यालय पातळीवर मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या मा.नगरसेविका संजीवनी जाधव यांच्या हस्ते झाले. गालीचा रांगोळी, सामाजिक संदेश, शिक्षण , आवडते व्यक्तिमत्व, भारतीय संस्कृती, पाणी हेच जीवन अशा विविध विषयांवरील रांगोळी पाहायला मिळेल.प्रदर्शनासाठी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांनी दिली.रांगोळी स्पर्धेत कु.धोपे तेजस्वी , कु. अडसूळ जागृती, कु.शेलार अनुराधा यांना अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला अशी माहिती क. महाविद्यालयाचे उपप्राचार्य विलास शिंदे ,अनिल जगताप यांनी दिली.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.जयश्री अकोलकर व प्रा.संगीता चौरे यांनी कामकाज पाहिले. रांगोळी स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
रांगोळी स्पर्धसाठी प्रा.सविता मालुसरे , प्रा. रागिनी जाधव , प्रा.विशाखा खांडेकर, प्रा.शेटे एस.एस. , प्रा.विजयश्री डुंबरे, प्रा. मंजुषा भोसले, प्रा.अश्विनी जवळकर, प्रा. नलिनी म्हेत्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.